पुणे – महिला व मुलींवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये (crime) सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. यामध्ये तरुणी तसेच अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळयात अडकवून लुटल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशातच पुणे शहरात (Pune) एका तरुणाने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवत मुलीशी जवळीक साधत तिची फसवणूक केली आहे. मुलीसोबत प्रेमाचे नाटक करत तरुणानं तुझ्या माझ्या लफड्याविषयी दोघांच्या घरी सांगेन असे म्हणत तिला ब्लॅकमेल(Blackmail) केले. यावरून मुलीला लुटल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकानरणी 19 वर्षीय तरुणावर सिंहगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ऋत्विक अशोक दिघे (वय 19, रा. दत्तनगर, कात्रज) याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत आनंदनगर येथील 17 वर्षीय तरुणीच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ही घटना 2019 ते मार्च2022 र्यंत सुरु असल्याची माहिटी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 17 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत आरोपीने मी मैत्री केली. पुढे मी तुझ्यावर प्रेम करतो असे सांगत प्रेमाचे नाटक केले. त्यानंतर काही दिवसांनी आपल्या दोघांच्या रिलेशन विषयी घरी सांगेल असे ब्लॅकमेल करत तिच्याकडं पैश्याची मागणी केली.एवढंच नव्हे तर खडकवासला येथे घेऊन गेला. तेथे तिच्या गालावर, हातावर किस करुन तिचा विनयभंग केला. यानंतर त्याचा मित्र सार्थक यानेही तुझ्या व ऋत्विकच्या रिलेशनबद्दल तुमच्या घरी सांगेन म्हणत तिच्याकडं पैश्याचे मागणी केली.
आपल्या मुलीला सातत्याने पैसे का लागत आहेत., तिला सतत पैश्याचे गरज का भासत आहे असा संशय आल्याने आईने मुलीकडे चौकशी केली.त्यानंतर मुलीने घडलेला सर्व प्रकार तिला सांगितला. त्यानंतर मुलीच्या आईने पोलिसात धाव घेत घडलेला सर्व प्रकार सांगितला.
कोण आहे पाकिटमार अभिनेत्री रुपा दत्ता? अनुराग कश्यपवर केला होता लैंगिक शोषणाचा आरोप
‘फडणवीसांच्या ऐकण्यात आणि पाहण्यात काहीतरी दोष’, संजय राऊतांचा पलटवार; खोटं न बोलण्याचाही सल्ला!