प्रदीप कापसे, पुणे, दि. 9 फेब्रुवारी 2024 | शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar Shot in Mumbai) यांच्या हत्येनंतर राज्यात खळबळ उडाली आहे. फेसबूक लाईव्ह सुरु असताना ही हत्या झाली होती. यावरुन विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलची पाहणी केल्यानंतर माध्यमांनी त्यांच्यांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार म्हणाले की, व्हिडिओ पाहिल्यानंतर दोघांचे मित्रत्वाचे संबंध दिसले. त्यांच्यात चांगला संवाद झाला…पण आरोपीच्या चेहऱ्यावर वेगळे काही आणि मनात वेगळे होते.
अभिषेक घोसाळकर यांची हत्या म्हणजे माणूसकीला काळीमा फासणारा प्रकार आला. महाराष्ट्रात अशा घटना घडू नयेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अभिषेक आणि मॉरीस यांच्यात चांगला संवाद दिसतो. त्यांच्यात मित्रत्वाचे संबंध दिसत होते. व्हिडिओ पाहिल्यावर मॉरीस गोळीबार करणार असे वाटत नाही. परंतु आरोपीच्या चेहऱ्यावर एक तर मनात वेगळे असा हा प्रकार आहे. आता या घटनेचा नीट तपास व्हायला हवा. या हत्येमागील खरं कारण समोर आले पाहिजे. आता विरोधक बिहारचे उदाहरण देणार पण मुंबईतील दोन्ही गोळीबाराच्या घटना जर बघितल्या तर वेगळ्या आहेत. पिस्तूल देताना सगळ्या गोष्टी तपासल्या जात आहेत.
सोशल मीडियावर गुंड रिल्स प्रसारीत करत आहे. त्यांच्यावर पोलीस कारवाई करणार आहे. एवढं करून कोणाची मस्ती असेल तर पोलिसी खाक्या दाखवायला लागेल. पुण्याचे पोलीस आयुक्त आज नाशिकमध्ये आहेत. यामुळे पुणे सीपी आणि पुणे ग्रामीण एसपी यांना सूचना दिल्या आहेत.
मी नेहमी सांगतो गुंड प्रवृत्तीच्या लोकांना मला भेटवू नका. परंतु परवा मला भेटायला आलेला गुंड हा ओळखीच्या व्यक्तीसोबत आला होता. एक पत्रकार मला भेटायला आला, त्याच्यासोबत तो आला होता. त्याला नंतर मी फोन केला. तेव्हा त्याने चूक कबूल केली. पण या प्रकरणात माझी बदनामी झाली.
हे ही वाचा