लोणावळा (पुणे) : आई एकवीरा देवीचे (Ekvira Devi)दर्शन घेऊन मुंबईच्या (Mumbai) दिशेने जाणाऱ्या भविकांच्या कारला अपघात (Accident) झाला आहे. या अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सुदैवाने या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून वाहनातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. आई एकवीरा देवीचे दर्शन घेऊन कारमधून काही प्रवासी मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते. भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार चारवेळेस पलटी झाली. यात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. ही घटना सकाळी सव्वा आठच्या सुमारास खंडाळा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राजवळील वळणावर घडली आहे. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. यावेळी कार पलटी घेऊन रस्त्याच्या कडेला फरफटत गेली. रस्त्यावर कोणी नसल्याने अनर्थ टळला.
#Pune : एकवीरा देवीचं दर्शन घेऊन मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या भविकांच्या कारनं तीनवेळा घेतली पलटी… थरार सीसीटीव्हीत कैद…#lonavala #ekviradevi #ACCIDENT #CCTVFootage
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/pJlmH04UAs pic.twitter.com/efN5gUCVT8— TV9 Marathi (@TV9Marathi) April 6, 2022
मावळमधील एकवीरा देवी यात्रा उत्सव काळात सध्या तीन दिवस गड परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. एकवीरा गडावर मोठ्या प्रमाणात गर्दी होईल म्हणून पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी कलम 144 लागू केले आहे. मात्र त्यांच्या अजब आदेशाने भाविक संभ्रमात तर दुसरीकडे कोरोनाचे सर्व निर्बंध हटविले असताना हा आदेश काढल्याने भाविकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी कार्ला वाकसई, वरसोली, मळवली, वेहरगाव येथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, म्हणून या भागात भारतीय दंड विधान कलम 144 लागू केले आहे. यात शोभेची दारू, फटाके गडावर नेणे, मुक्या प्राण्यांची हत्या करणे आणि दारूबंदी आदेश परिसरात यात्रा काळात लागू करण्यात आले आहेत.