Pimpri Chinchwad Crime|विनयभंग करणाऱ्या आरोपीला अवघ्या 72 तासात दिली 18 महिन्यांची शिक्षा

| Updated on: Jan 30, 2022 | 10:24 AM

आरोपी समीरने महीलेच्या राहत्या घरी जाऊन छेड छाड करून विनयभंग करून जीव मारण्याची धमकी दिली. याबाबत या संबंधित महिलेने त्याची तक्रार हिंजवडी पोलिसांत दाखल केली होती. 36 तासात आरोपी समीर जाधव याला पुरावे गोळा करत अटक करून न्यायालायत हजर केले.

Pimpri Chinchwad Crime|विनयभंग करणाऱ्या आरोपीला अवघ्या 72 तासात दिली 18 महिन्यांची शिक्षा
संग्रहित फोटो
Follow us on

पिंपरी – शहरात गुन्हेगारीचे घटना वाढत असताना , दुसरीकडे महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. अशातच हिंजवडी परिसरात महिलेचा विनयभंग (Molestation of a woman)केल्याची घटना घडली होती. या घटनेची हिंजवडी पोलीस (Hinjewadi Police) तात्काळ दखल आरोपीला अटक करून 72 तासाच्या आतमध्ये न्यायालयात सादर केले. त्यानंतर शिवाजीनगर न्यायालयाने (Shivajinagar Court) आरोपीला 18 महिन्याची शिक्षा सुनावली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव समीर श्रीरंग जाधव असे आहे. न्यायालयाने तत्काळ सर्व पुरावे आणि साक्षीदार तपासत आरोपी वरील आरोप सिद्ध करत त्याला कलम 354 अन्वये 6 महिने,कलम 452 अन्वये 6 महिने कलम 506 अन्वये 6 महिने अशी सक्त मजुरी सह 9000-दंड व हा दंड न भरल्यास एक महिना साधी कैद व अपील कालावधी नंतर दंड रक्कम ही फिर्यादी यांना देण्यात येईल अशी शिक्षा सुनावली व आरोपीला एकूण 18 महिन्याची कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

अशी घडली घटना

आरोपी समीर श्रीरंग जाधव हा हॉटेल व्यावसायिक आहे. घटनेच्या दिवशी 25 जानेवारी 2022 रोजीला आरोपी समीरने महीलेच्या राहत्या घरी जाऊन छेड छाड करून विनयभंग करून जीव मारण्याची धमकी दिली. याबाबत या संबंधित महिलेने त्याची तक्रार हिंजवडी पोलिसांत दाखल केली होती. 36 तासात आरोपी समीर जाधव याला पुरावे गोळा करत अटक करून न्यायालायत हजर केले.

दुकाने फोडून लाखोंचा ऐवज लंपास
दुसरीकडे अज्ञात चोरट्यांनी दुकाने फोडून लाखोंचा मुद्देमाल चोरून नेला. यात तीन लाख 13 हजार 409 रुपयांचा किराणामाल तसेच रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे. याप्रकरणी वाकड आणि तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सुजाराम वेनाराम सिरवी (वय 38, रा. विजय नगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सिरवी यांचे काळेवाडी येथील शिवाजी चौक येथे नॅशनल ट्रेडर्स नावाचे किराणा मालाचे दुकान तसेच गोडाऊन आहे‌. साडेनऊच्या सुमारास दुकान व गोडाऊन बंद केले. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनचे शटर उचकटून तीन लाख 13 हजार 409 रुपये किमतीचा किराणामाल व फिर्यादीच्या खात्यामधील ट्रांजेक्शनद्वारे 80 हजार रुपये, असा एकूण तीन लाख 93 हजार 409 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी कृपा मेडिकल श्री गणेश मेडिकल व रिलायन्स स्मार्ट पॉइंट मॉलमध्ये शटरचे कुलूप तोडून प्रवेश केला. कॅश काउंटरमधील चार हजारांची रोकड, श्री गणेश मेडिकलमधील एक हजारांची रोकड चोरली. तसेच रिलायन्स स्मार्ट पॉइंट मॉल या दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. अज्ञात चोरट्यांनी दुकानातील दोन दरवाजे तोडून कॅश काउंटरचे रिकामे लोखंडी दोन ड्राॅवर चोरून नेले. मावळ तालुक्यातील मौजे वराळे येथे हा प्रकार घडला.

Mouth Ulcers issue : अल्सरचा प्रचंड त्रास होतोय? जेवणही करता येत नाहीये मग आहारामध्ये या पदार्थांचा समावेश करा!

Video | त्यांना कळलं असेल की जिप्सीत ‘उद्धव ठाकरे द टायगर’ असेल- उद्धव ठाकरे

Grape : ज्याची भीती होती तेच झाले, आता द्राक्ष उत्पादकांसमोर एकच पर्याय, काय स्थिती आहे द्राक्षांच्या पंढरीत, वाचा सविस्तर