अभिजित पोते, पुणे, दि. 26 फेब्रुवारी 2024 | पुणे शहरातील ड्रग्स प्रकरणाची चर्चा ललित पाटील प्रकरणापासून सुरु झाली. त्यानंतर आता पुणे शहरात ड्रग्सचा कारखाना मिळाला आहे. या ड्रग्स कारखान्याचे रॅकेट पंजाबमधून इंग्लंडपर्यंत निघाले. पुण्यात 4 हजार कोटीं ड्रग्स सापडले. पण पुणेकरांनी यावर साधी एक प्रतिक्रिया दिलेली नाही. मागे ललित पाटील याचे ड्रग्स प्रकरण समोर आले. त्या प्रकाराचा वापर केवळ राजकारणासाठीच झाला. पण यामुळे तरुणपिढी बरबाद होत आहे. या संदर्भात आपण गांभीर्याने विचार करणार आहोत की नाही? जर आता काही केले नाहीतर पुण्याचा उडता पंजाब व्हायला वेळ लागणार नाही, अशी भीती मुळशी पॅटर्नमधील अभिनेते रमेश परदेशी उर्फ “पिट्या भाई” यांनी विचारला.
अभिनेते रमेश परदेशी म्हणतात, मी टेकडीवर पळायला आला होतो. तेव्हा दोन मुली बिअर आणि दारुच्या नशेत कोपऱ्यात पडल्या होत्या. काही तरुण गाडीवर घेऊन त्यांना आले. अकरावी, बारावीतील या मुली आहेत. त्यातील एका मुलीला शुद्ध नाही. त्यांना आम्ही दावाखान्यात घेऊन जात आहोत. आपले आपल्या शहराकडे लक्ष आहे की नाही? काय चालले आपल्या पुण्यात? वेताळ टेकडीवर आम्ही व्यायामला येतो. परंतु या टेकडीवर ही लहान मुले नशा करत आहेत. त्यांना ड्रग्स इतके सहज कसे उपलब्ध होत आहे. त्यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर त्यांची आई-बाबांनी कोणाकडे बघावे. आई बाप मुलांकडे लक्ष देतात की नाही. ही आजची जनरेशन आई बाबाच्या जिवावर शिकायला पुण्यात येतात. मग मोकळा वेळ मिळला की व्यसन करतात.
मी पालक आहे. माझ्या घरातही लहान मुलगी आहे. आपल्या मुलांनी असे केले तर कोणाकडे बघायचे, यामुळे मला भीती वाटत आहे. आता प्रत्येक पुणेकरांनी लक्ष देण्याची गरज आहे. पब, डिस्कोत हा प्रकार सुरु आहे. आई-बाब काहीच लक्ष देत नाही का. या प्रकारावर विचार करण्याची गरज आहे. आपण काय करु शकतो. शिक्षणाचे माहेर घर असलेल्या पुण्यात काय सुरु आहे. ड्रग्स सेवन केलेल्या या मुलांच्या तोंडातून फेस येत आहे. आपण या गोष्टीकडे लक्ष देणार आहोत की नाही. साडेचार हजार कोटींचे ड्रग्स सापडले पण एकाही पुणेकरांनी प्रतिक्रिया दिली नाही. आता विचार केला नाही तर उडता पंजाब पुण्याचा होईल.
शहरातील पानपट्यांमध्ये सहज ड्रग्स मिळत आहे. पब आणि हॉटेलमध्ये ड्रग्स घेऊन मुले पडलेले असतात. रात्री रस्त्यांवर ही मुले दिसतात. आपण आपल्या पुणे शहराकडे लक्ष देणार आहोत की नाही. पुण्याच्या संस्कृतीचे वाटोळे चालवले आहे. शिक्षणासाठी आलेली ही मुले पुणे शहरात काय करत आहेत.
हे ही वाचा
पुण्यातील नशेचा हादरवणारा व्हिडिओ, वेताळ टेकडीवर नशेत गुंग तरुणी