कोरोनाची तिसरी लाट गृहीत धरूनच काटेकोर नियोजन करा; अजित पवारांचे प्रशासनाला आदेश

| Updated on: May 01, 2021 | 5:09 PM

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी आरोग्य प्रशासन झुंज देत असतानाच कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (administration should prepare for corona third wave, says ajit pawar)

कोरोनाची तिसरी लाट गृहीत धरूनच काटेकोर नियोजन करा; अजित पवारांचे प्रशासनाला आदेश
ajit pawar
Follow us on

पुणे: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी आरोग्य प्रशासन झुंज देत असतानाच कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरूनच काटेकोर नियोजन करा, असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. (administration should prepare for corona third wave, says ajit pawar)

पुण्यातील विधानभवन (कौन्सिल हॉल) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनाबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारणीवर भर द्यावा. त्याचबरोबर आरोग्य सुविधा वाढवणे, ऑक्सिजन पुरवठा, बेड उपलब्धता व रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्धता यासोबतच कोरोनाबाधित रूग्णांना उपचार सुविधांमध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता भासणार नाही, यासाठी शासन स्तरावर सातत्याने प्रयत्न सुरु आहेत, असं अजित पवार म्हणाले. लसीकरणाला गती देण्यावर राज्य शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितलं.

खेड्यात कोरोना पसरणार नाही याची काळजी घ्या

कोरोना रुग्णांना आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यामध्ये कमतरता भासणार नाही, यासाठी राज्यशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णाला आवश्यक वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी आवश्यक त्या सुविधांमध्ये तातडीने वाढ करा, ग्रामीण भागात रूग्णसंख्या वाढू नये म्हणून सजग राहून नियोजन करणे आवश्यक आहे. आवश्यक तिथे खाटांची गरज, उपलब्धता व इतर सामग्री यासाठी सतत समन्वय ठेवावा. राज्यशासनाकडून 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने आवश्यक निधीची तरतुद केलेली आहे. परंतु, लसीची उपलब्धता ही मर्यादित असल्याने नागरिकांनी लगेच लस केंद्रांवर गर्दी करू नये, कोविन ॲपवर नोंदणी केल्यानंतर जी तारीख आणि वेळ मिळेल त्या दिवशी जाऊन लस घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

गरीबांना मोफत धान्य

कोरोना महामारीच्या संकटकाळात गरजूंना अन्नधान्य उपलब्ध व्हावे, यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना एक महिन्याचे मोफत अन्नधान्य वितरीत करण्यात येत आहे. जिल्ह्यातील हजारो गरजू कुटुंबांना त्याचा लाभ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी खासदार गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, आमदार अतुल बेनके, आमदार चेतन तुपे, आमदार सिध्दार्थ शिरोळे तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पिंपरी-चिंचवड महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंके आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (administration should prepare for corona third wave, says ajit pawar)

 

संबंधित बातम्या:

देशातील कोरोना काळातील सर्वात वाईट महिना; एप्रिलमध्ये 66 लाख नव्या रुग्णांची भर

22 वर्षीय तरुणीची बर्थडेला हत्या, शारीरिक संबंधावेळी गुदमरुन मृत्यू, मारेकऱ्याचा दावा

Maharashtra Coronavirus LIVE Update : कोल्हापुरात ऑक्सिजन न मिळाल्याने कोरोना रुग्णांचा मृत्यू

(administration should prepare for corona third wave, says ajit pawar)