पुणे येथील तरुणीवर कोयता हल्ल्यानंतर पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई

| Updated on: Jun 29, 2023 | 2:43 PM

Pune Cirme News : तरुणीवर कोयता हल्ला प्रकरणात पुणे पोलीस आयुक्तांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात राजकीय पातळीवर अन् समाजातूनही पोलिसांवर टीका होत होती. अखेर तिसऱ्या दिवशी पोलीस आयुक्तांनी कारवाई केली आहे.

पुणे येथील तरुणीवर कोयता हल्ल्यानंतर पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई
Follow us on

योगेश बोरसे, पुणे : पुणे येथील सदाशिव पेठेत भररस्तावर तरुणीवर कोयताने हल्ला झाला होता. त्या तरुणीवर हल्ला करणारा आरोपीचे नाव शांतनु जाधव आहे. तो पोलीस कोठडीत आहे. तो अन् ती तरुणी दोघे कॉलेजमधील मित्र होते. त्याने तिला प्रपोज केले. परंतु तिचा प्रस्ताव तरुणीने फेटाळला. त्यानंतर तिने त्याच्याशी संवादही बंद केला होता. या प्रकारामुळे शांतनु संतप्त झाला. त्याने तिला ठार करण्याची धमकी दिली. तो त्या तरुणीचा कॉलेजमध्ये जाऊन मारहाणसुद्धा करत होता. या प्रकराने त्रस्त होऊन त्या तरुणीने शांतनुच्या कुटुंबियांकडे तक्रार केली. त्याने त्याने तिच्यावर हल्ला केला.

काय घडले मंगळवार

शांतून जाधव मंगळवारी २७ जून रोजी सदाशिव पेठेतील पेरुगेट पोलीस चौकीजवळ आला. त्यावेळी त्या तरुणीला आडवत मला तुझ्याशी बोलायचे आहे, तू बोलत का नाहीस? असा सवाल केला. तरुणीने बोलण्यास नकार देताच त्याने बॅगेत ठेवलेला कोयता काढला अन् हल्ला केला. त्यावेळी पीडित तरुणी आरोपीपासून वाचण्यासाठी सैरावैरा धावत होती. ती एका बेकरीत गेली. त्या बेकरीवाल्याने शटर लावून घेतले. मग लेशपाल जवळगे या युवकाने धाडसाने तिला वाचवले. त्यानंतर तिला पेरुगेट पोलीस चौकीत नेले. परंतु पोलीस चौकीवर पोलीस नव्हते. वीस ते पंचवीस मिनिट पोलीस आले नाहीत, असा आरोप झाला.

आयुक्तांनी केली कारवाई

या प्रकारानंतर पोलिसांवर सर्वत्र टीका होऊ लागली. त्यामुळे पोलिस उपायुक्त संदीप सिंह गिल यांनी कठोर कारवाई केली. पोलीस हवालदार सुनिल शांताराम साठे, पोलीस शिपाई प्रशांत प्रकाश जगदाळे आणि पोलीस शिपाई सागर नामदेव राणे या तिघांना निलंबित करण्याचे आदेश काढले. त्यात दोन बिट मार्शल आणि एक चौकी अंमलदार आहे. आता या तिघांची पुणे आयुक्तांच्या माध्यमातून चौकशी केली जाणार आहे. या पोलिसांवर कामात हलगर्जी केल्याचा आरोप आहे. त्यांच्यांमुळे पोलिसांची प्रतिमा समाजात मलिन झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

हे ही वाचा

पुणे कोयता हल्ल्यातून वाचलेल्या मुलीनेच सांगितली आरोपीची A to Z माहिती

पुणे दर्शना पवार अन् कोयता हल्ला प्रकरणानंतर पोलीस खळबळून जागे, काय सुरु केला उपक्रम