घाटकोपरमधील घटनेनंतर पुणे महानगरपालिका ॲक्शन मोडवर, इतक्या होर्डिंगसवर कारवाई

| Updated on: May 14, 2024 | 3:19 PM

घाटकोपरमध्ये घडलेल्या घटनेनंतर नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. या घटनेनंतर अनेक महापालिका अलर्ट झाल्या आहेत. मोठ मोठ्या होर्डिंगचं ऑडिट केले जात आहे. काल घाटकोपरमध्ये वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळून आतापर्यत १४ जण ठारे झाले आहेत.

घाटकोपरमधील घटनेनंतर पुणे महानगरपालिका ॲक्शन मोडवर, इतक्या होर्डिंगसवर कारवाई
Follow us on

Pune | सोमवारी मुंबई वादळी वाऱ्यामुळे पडलेल्या होर्डिंगमुळे १४ जणांचा मृत्यू झाला आहे. घाटकोपरमध्ये घडलेल्या या घटनेमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जवळपास १०० लोकं या होर्डिंगखाली दाबली गेली होती. अनेकांना यामधून सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं आहे. या घटनेनंतर पुणे महापालिका अलर्ट झाली आहे. पुणे शहरात एकूण 1564 अनधिकृत होर्डिंगसवर पुणे महापालिकेने कारवाई केली आहे.

पुणे महापालिकेची धडक कारवाई

मुंबईत घडलेल्या घटनेनंतर पुणे महानगरपालिका अलर्ट मोडवर आहे. शहरतील सगळ्या होर्डिंगचे ऑडिट करण्याचे आयुक्तांनी आदेश दिले आहेत. शहरात एकूण 2500 होर्डिंगस असल्याची माहिती पुणे महापालिका आयुक्तांनी दिली आहे. जर अनधिकृत असेल तर त्याच लायसन्स रद्द करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

2500 परवानग्या आहेत तेवढेच अधिकृत होर्डिंगस असून अनधिकृत असेल तर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देखील आयुक्तांनी दिले आहेत. शहरात एकूण 2598 अधिकृत होर्डिंगस आढळले आहेत. तर 2300 होर्डिंगसचं ऑडिट झालं आहे. एकूण 1564 अनधिकृत होर्डिंगसवर पुणे महानगरपालिकेची कारवाई करण्यात आली आहे.

घाटकोपरची घटना दुर्दैवी – मुख्यमंत्री

सोमवारी संध्याकाळी ही घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळाला भेट दिली. यावेळी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत देखील त्यांनी जाहीर केली. जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु असून त्याचा खर्च देखील सरकारने उचलला आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील सर्व होर्डिंगचं ऑडिट करण्याचे आदेश पालिका आयुक्तांना दिले आहेत.

कल्याण डोंबिवलीत मनसे आक्रमक

मनसेचे आमदार राजू पाटील यांनी कल्याण डोंबिवली परिसरातील अनधिकृत होर्डिंगचे स्ट्रक्चर ऑडिट करून अनधिकृत होर्डिंग काढण्याचे पालिकेला निवेदन दिले आहे. सोमवारी घाटकोपरमध्ये घडलेल्या घटनेमुळे मनसे आक्रमक झाली आहे.

घाटकोपर येथील पेट्रोल पंप होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंड याने 2009 साली मुलुंड येथून आमदारकीसाठी निवडणूक लढवली होती. आमदारकीची निवडणूक त्याने अपक्ष म्हणून निवडली होती. यावेळी त्याने त्याच्यावर निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात सुमारे 26 गुन्हे असल्याचं नमूद केले आहे. 26 गुन्हे हे विनापरवानगी साइन बोर्ड लावल्याचे आहेत.