पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर (mumbai pune expressway) बोरघाटात ट्रकनं (Truck) पेट घेतला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली. मुंबईवरून पुण्याला जाणाऱ्या ट्रकला अचानक आग लागल्याने या मार्गावरील वाहतूक (traffic) विस्कळीत झाली होती. अचानक ट्रकनं पेट (fire) घेत असल्याचं लक्षात येताच चालकानं प्रसंगावधान राखत मोठी दुर्घटना टळली आहे.
क्षणात ट्रकचा कोळसा!
सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ट्रकचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. ट्रक पेट घेत असल्याचं चालकाच्या जेव्हा लक्षात आलं, तेव्हा त्यानं वेळीच ट्रक रस्त्याच्या कडेला आणून पार्क केला. चालकानं ट्रकमधून वेळीच काढता पाय घेतल्यानं त्याची जीव बालंबाल बचावलाय. दरम्यान, क्षणार्धात ट्रक आगीच्या ज्वाळांनी काबीज केला होता. बघता बघता ट्रक जळून खाकही झाला.
दरम्यान, ट्रकला आग लागल्याची माहिती मिळताच रेस्क्यू टीम आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळवण्याचाही प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत संपूर्ण ट्रकचा कोळसा झाला होता.
वाहतुकीवर परिणाम
ट्रकला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी आयआरबी कर्मचारी, देवदूत रेस्क्यू टीम,आणि महामार्ग पोलिसांनी धाव घेतली होती. ट्रकला आग लागल्यामुळे खोळंबलेली वाहतूक पूर्ववत करण्यासाठी द्रुतगती महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, ट्रकला आग लागल्यानं मुंबईवरुन पुण्याला जाणारी वाहतूक धीम्या गतीनं सुरु असून त्याचा फटका पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या वाहतुकीला बसलाय.
पाहा व्हिडीओ –
इतर बातम्या –
नाताळ, नववर्ष स्वागताचे कार्यक्रम टाळा, मुंबई महापालिकेचं आवाहन; नव्या सूचना जारी
Petrol Rate Today | शहरात पेट्रोल-डिझेलचे भाव काय आहेत, घ्या जाणून एका क्लिकवर
कल्याण रेल्वे परिसरात हल्लेखोर, चोरांचा सुळसुळाट, रेल्वे यार्डात तरुणावर चाकूहल्ला