पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘टीव्ही 9 मराठी’च्या महाराष्ट्राचा महासंकल्प या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबतच्या 2019च्या पहाटेच्या शपथविधीबद्दल मोठा गौप्यस्फोट केलेला. त्या गौप्यस्फोटाबद्दल अजित पवार गेल्या तीन दिवसांपासून काहीच बोलले नाही. विशेष म्हणजे आज प्रसारमाध्यमांनी त्यांना त्याबद्दल प्रश्न विचारण्याचा प्रयत्नदेखील केला. पण अजित पवार यांनी गाडी न थांबवता तिथून निघून जाणं पसंत केलं. पण त्यानंतर अखेर अजित पवार यांना चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घ्यावी लागली. त्यावेळी पत्रकारांनी फडणवीसांच्या गौप्यस्फोटाबद्दलचा पहिलाच प्रश्न विचारला. पण त्यावर त्यांनी फार सावध प्रतिक्रिया दिली.
“पहाटेच्या शपथविधीबाबत बोलणार नाही. मला बाकिच्यांबद्दल बोलायचंच नाही. मी त्याबद्दल बोलणार नाही. विषय संपला. मला त्याबद्दल बोलायचंच नाही. तुम्ही दुसरे काही विषय असतील ते बोला. तुम्हाला कळत नाही. अजित पवार मागेच बोललेला आहे. तो त्याच्या मतावर ठाम राहणार. त्यामुळे तुम्ही पुन्हा उगळून काढलं तरी माझ्याकडून हेच उत्तर मिळणार”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
“ज्यावेळी उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत चर्चा करत आहेत. त्यांची चर्चा पुढे गेलीय हे जेव्हा लक्षात आलं त्यावेळी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली की आम्हाला स्थिर सरकार हवंय. म्हणून आपण सरकार तयार करुया. राजकारणात एखादी व्यक्ती तुम्हाला धोका देते त्यावेळी तुम्हाला चेहरा पाहत बसता येत नाही. त्यामुळे आम्ही निश्चय केला की चला ठिक आहे. म्हणून आम्ही त्यांच्याशी चर्चा केली”, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केलाय.
त्यावेळी शरद पवार यांच्यासोबतच चर्चा झाली होती. ती काही खाली चर्चा झाली नव्हती. शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतर गोष्टी ठरल्या. त्या ठरल्यानंतर कशा बदलल्या आपण सगळ्यांनी बघितलं आहे. त्यामुळे त्याही ठिकाणी एकप्रकारचा विश्वासघात झाला, असा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला.
पहाटेच्या शपथविधीच्यावेळी अजित पवार यांचं बंड होतं का? इथूनच सुरुवात होईल. मला असं वाटतं की, तुमच्याकडे अजित दादा येवून गेले आहेत. त्यांनी बऱ्याच प्रश्नांवर नो कमेंट्स केलंय. त्यामुळे काही करता का होईना त्यांनी माझ्यासोबत शपथविधी घेतली होती. त्यामुळे काही पथ्य मीसुद्धा पाळली पाहिजेत. त्यामुळे काही कमेंट त्यांना करुद्या. त्यानंतर उर्वरित कमेंट मी करतो, असा
अजित दादा आमच्याकडे आले होते किंवा त्यांनी माझ्याबद्दल शपथ घेतली होती ती फसवणुकीच्या भावनेतून घेतली नव्हती ही गोष्ट सांगावी लागेल. त्यामुळे त्यांच्याकडे ठरल्यानंतर काय स्ट्रॅटेजी बदलल्या, ते कसे तोंडघशी पडले हे ते सांगतील. त्यांनी नाही सांगितलं तर पुढच्या मुलाखतीत मी सांगेन, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.