पवार कुटुंबात जुना पाडवा कसा होत होता… अजित पवार यांनी शरद पवार यांच्या प्रश्नाला दिले उत्तर

| Updated on: Nov 02, 2024 | 3:08 PM

जुन्या पत्रकारांना माहिती असले पहिल्यापासून म्हणजे आमचे आजी-अजोबा असल्यापासून लोक काठेवाडीत भेटण्यास येत होते. ही जुनी पद्धत आहे. त्यानंतर बारामतीत जमीन घेतली गेली. गोविंद बाग हे घर बांधले गेले. मग त्या ठिकाणच्या लोकांना लांब यावे लागू नये म्हणून गोविंद बागेत पाडवा साजरा सुरु झाला.

पवार कुटुंबात जुना पाडवा कसा होत होता... अजित पवार यांनी शरद पवार यांच्या प्रश्नाला दिले उत्तर
अजित पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी काठेवाडीत गर्दी झाली
Follow us on

राज्यातील राजकारणात दिवाळी पाडव्याची चर्चा सुरु आहे. या दिवाळी पाडव्याला पवार कुटुंबीय प्रथमच एकत्र आले नाही. त्यामुळे राजकीय मतभेद कुटुंबात असल्याचे समोर आले. सकाळी शरद पवार यांनी बोलताना सांगितले की, अजित पवार गोविंदबागेत आले असते तर आनंद झाला असता. त्याला उत्तर देताना अजित पवार यांनी पवार कुटुंबातील पाडव्याची जुनी पद्धत सांगितली. तसेच बारामतीमधील गोविंद बागेत का गेलो नाही? ते सुद्धा सांगितले.

काय म्हणाले अजित पवार

जुन्या पत्रकारांना माहिती असले पहिल्यापासून म्हणजे आमचे आजी-अजोबा असल्यापासून लोक काठेवाडीत भेटण्यास येत होते. ही जुनी पद्धत आहे. त्यानंतर बारामतीत जमीन घेतली गेली. गोविंद बाग हे घर बांधले गेले. मग त्या ठिकाणच्या लोकांना लांब यावे लागू नये म्हणून गोविंद बागेत पाडवा साजरा सुरु झाला. आज कार्यकर्त्यांची गर्दी होऊ नये म्हणून दोन ठिकाणी लोक आले. त्यामुळे ट्रॅफिक जाम झाली नाही. लोकांची गैरसोय कमी झाली. लोकांना पटकन घरी जाता आले. कारण लोकांना मलाही भेटायचे असते आणि साहेबांनाही भेटायचे असते. त्यामुळे ते येऊन गेले. दोन ठिकाणी पाडवा झाल्याने लोकांची गैरसोय टळली.

ते सरकारचे कौतूक का करणार?

लाडकी बहीण योजना, उज्ज्वला गॅस योजना बाबत शरद पवार यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यावर अजित पवार म्हणाले, ते महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहे. ते सरकारचे कौतूक कसे करणार? ते नकारात्मकच बोलणार आहे, हे स्पष्टच आहे. आमच्या योजना आणि आमचे व्हिजन पाहिल्यावर जनता आम्हालाच साथ देईल, असा आमचा विश्वास आहे.

हे सुद्धा वाचा

मग त्या गाड्यांची तपासणी करा

पोलिसांच्या गाड्यांतून पैसे पुरवले जात असतील तर निवडणूक आयोगाने पोलिसांच्या गाड्यांची तपासणी करावी. हे आरोप बिनबुडाचे आहेत. त्यात काही तथ्य नाही. राज्यात अनेक ठिकाणी रोकड मिळत आहे. परंतु ही रक्कम कोणाची आहे? हे रक्कम हवालाची आहे का? व्यापाऱ्यांची आहे का? हे सर्व प्रश्न आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

हे ही वाचा…

पवार कुटुंबियांमध्ये दिवाळी पाडव्यातील फूट…शरद पवार स्पष्टच बोलले…”तर मला…”