Ajit Pawar | कर्मचारी भरती प्रकरणावरुन अजित पवार यांनी रोहित पवार यांना दिले रोखठोक उत्तर, म्हणाले…

| Updated on: Sep 15, 2023 | 2:21 PM

ajit pawar and rohit pawar | राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर काका-पुतणे म्हणजे शरद पवार आणि अजित पवार यांची चर्चा सुरु आहे. त्याचवेळी अजित पवार आणि पुतणे रोहित पवार यांची चर्चा सध्या होत आहे. रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती...

Ajit Pawar | कर्मचारी भरती प्रकरणावरुन अजित पवार यांनी रोहित पवार यांना दिले रोखठोक उत्तर, म्हणाले...
ajit pawar and rohit pawar
Follow us on

पुणे | 15 सप्टेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी २ जुलै रोजी बंड केले होते. त्यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शरद पवार अशा दोन गटात विभागली गेली. अजित पवार सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर शरद पवार गटाकडून अजित पवार गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अजित पवार यांच्या गटातील २४ आमदारांना अपात्र करण्याची प्रक्रिया सुरु केली असताना शरद पवार स्वत: राज्यभरात सभा घेत अजित पवार गटाला घेरत आहेत. राष्ट्रवादीतील राजकारण यापद्धतीने सुरु असताना रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यात आता आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहे.

काय म्हणाले होते रोहित पवार

दोन दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. अजित पवार यांचे नाव न घेता रोहित पवार टि्वट करत म्हणाले होते की, एका सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात तीन कंत्राटी कर्मचारी काम करतील, असे वक्तव्य राज्यातील एका बड्या नेत्याने केले. त्यांच्या या भूमिकेबद्दल आश्चर्य वाटत आहे. त्यांनी हे सूत्र एका आमदारावर, खासदारावर लावले तर करोडो रुपयांची बचत होईल आणि त्यात अनेक शासकीय कर्मचारी काम करतील, असे ट्विट रोहित पवार यांनी केले होते.

अजित पवार यांनी घेतला समाचार

अजित पवार यांनी शुक्रवारी पुणे शहरात माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांचा चांगलाच समाचार घेतला. त्यांचे नाव न घेता अजित पवार म्हणाले की, काही जण कारण नसताना मला ट्रोल करत आहे. राज्यातील विविध विभागात दीड लाखांपेक्षा जास्त भरती सुरु आहे. परंतु आमच्या विरोधकांना उकळ्या फुटतात आणि सोशल मीडियावर बातम्या ते पोहचवतात.

हे सुद्धा वाचा

अशा ठिकाणी लगेच कर्मचारी लागतात

मी नेमके काय बोललो अन् कुठे बोललो हे पाहा. विविध विभागांचा मी आढावा घेत असताना अनेक ठिकाणी कर्मचारी कमी असल्याचे दिसले. काही ठिकाणी ताबडतोब कर्मचारी लागतात. शिक्षक, डॉक्टर, पोलीस असे काही विभाग आहेत. नवीन शिक्षकांची भरती होईपर्यंत निवृत्त झालेल्यांना तात्पुरते घेतले. तशीच पोलीस किंवा इतर विभागात भरती करताना काही काळ लागतो. तो काळ कंत्राटी भरतीमाध्यमातून काढावा लागतो.

तो जीआर मागील सरकारचा

कंत्राटी भरतीचा तो जीआर मागच्या काळातील सरकारचा आहे. त्यावर कोणाच्या सह्या आहेत ते मी दाखवू शकतो. परंतु विरोधक विरोधासाठी विरोध करत आहेत. मी बोलताना एक बोललो परंतु ती वास्तूस्थिती सांगितले. कारण नसताना गैरसमज करु नका, असे अजित पवार यांनी रोहित पवार यांना सुनावले.