Maharashtra Budget 2022 : Maharashtra Budget 2022 : पुण्यासाठी मोठी घोषणा! मेडिसिटी उभारणार, देशातली अशी पहिली वसाहत नेमकी कशी असणार?

| Updated on: Mar 11, 2022 | 3:26 PM

पुणे शहराच्या जवळ तीनशे एकर जागेत अत्याधुनिक इंद्रायणी मेडीसिटी उभारण्याचा शासनाचा मानस असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. ही वैद्यकीय वसाहत सुरु करता असताना त्यामध्ये सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळण्याची सोय असणार आहे.

Maharashtra Budget 2022 : Maharashtra Budget 2022 : पुण्यासाठी मोठी घोषणा! मेडिसिटी उभारणार, देशातली अशी पहिली वसाहत नेमकी कशी असणार?
अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना अजित पवार
Follow us on

मुंबई – महाविकास आघाडी सरकारकडून (Mahavikas Aghadi government) राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2022) सादर होत आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत असताना आरोग्यासाठी  भरीव तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीमध्ये 11 हजार कोटी रुपयांची तरतुदीची करण्यात आली आहे . 11 मार्च 1886 रोजी पेनसिल्व्हेनिया वुमन मेडिकल कॉलेजमधुन एमडी ही पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्या डॉ. आनंदीबाई जोशी या पहिल्या भारतीय व मराठी डॉक्टर होत्या आज या गोष्टीला 136 ववर्षे पूर्ण झाली. त्यांना स्मरून वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभागासाठींच्या तरतुदीची माहिती दिली. पुणे शहराच्या जवळ तीनशे एकर जागेत अत्याधुनिक इंद्रायणी मेडीसिटी उभारण्याचा शासनाचा मानस असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. ही वैद्यकीय वसाहत सुरु करता असताना त्यामध्ये सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळण्याची सोय असणार आहे.

या मेडीसीटीची वैशिष्ट्ये

  • या वैद्यकीय वसाहतीत रुग्णालये ,
  • वैद्यकीय संशोधन केंद्र
  • औषध उत्पादन
  • वेलनेस , फिजिओ थेरपी केंद्र

सर्व उपचार पद्धती एकाच ठिकाणी

या गोष्टी उपलब्ध असणारा आहेत. सर्व उपचार पद्धती एकाच ठिकाणी उपलब्ध असलेली ही देशातील पहिली वैद्यकीय वसाहत ठरेल असा विश्वासही अर्थमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला . प्रत्येक जिल्ह्यात टेलिमेडिसिन रुग्णालय उभारण्यात येणार असून त्यासाठी ३ हजार १८३ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

जुन्या वादातून तीन सख्ख्या भावांवर हल्ला, दोघांचा मृत्यू, बारा वर्षांनी आरोपीला शिक्षा

Video: हे कुठलंच टेक्स्ट बुक नाही शिकवू शकलं असतं, ‘कोविड बॅच’ म्हणून हिणवणाऱ्यांना जोर का झटका

Punjab Elections | अरविंद केजरीवालांनी विधानसभेचं ‘पंजाब हॉस्पिटल’ करुन टाकलं, कसं? हा बदल हवा हवासा!