राजकीय मतभेद विसरून वाडेश्वर कट्ट्यावर रंगला सर्वपक्षीय ‘दिवाळी फराळ’

| Updated on: Nov 03, 2021 | 1:19 PM

पुण्याची राजकीय परंपरा आहे. विचारांची लढाई ही विचारांनीच लढली जाते. आज सणाचा दिवस आहे. शेवटी निवडणूका येतात- जातात.  मतभेद असावेत, मनभेद नसावेत, असा या दिवाळी फराळ मागचा उद्देश आहे.

राजकीय मतभेद विसरून वाडेश्वर कट्ट्यावर रंगला सर्वपक्षीय दिवाळी फराळ
Diwali Faral' on Wadeshwar Katta
Follow us on

पुणे- यंदा दिवाळीत राज्यात ठिकठिकाणी राजकीय फटाके फुटत असताना पुण्यातल्या सगळ्या राजकीय पक्षांच्या शहराध्यक्षांनी एकमेकांचे तोंड गोड करत दिवाळी साजरी केली. गेल्या अनेक वर्षापासून वाडेश्वर कट्ट्यावर सुरू असलेली दिवाळी फराळ कार्यक्रमाची परंपरा यंदाही कायम राहिली. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ(Murlidhar Mohal)  आणि माजी महापौर प्रशांत जगताप (Prashant Jagtap)यांनी दिवाळी आधीच एकमेकांवर आरोप करत फटाके फोडले होते. आज वाडेश्वर कट्ट्यावर मात्र एकमेकांना लाडू भरवून तोंड गोड करत गळाभेट घेतली. वाडेश्वर कट्ट्याने गेली अनेक वर्षे जपलेली संवादाची परंपरा यानिमित्ताने पुणेकरांना अनुभवता आली.

 

”पुण्याची राजकीय परंपरा आहे. विचारांची लढाई ही विचारांनीच लढली जाते. आज सणाचा दिवस आहे. शेवटी निवडणूका येतात- जातात.  मतभेद असावेत, मनभेद नसावेत, असा या दिवाळी फराळ मागचा उद्देश आहे. अंकुश आण्णा व त्यांच्या टीमच्या वतीनं वाडेश्वर कट्ट्यावर दिवाळी फराळ कार्यक्रमाचं आयोजन  केलं. या दिवाळी फराळाच्या निमित्ताने, मागील राजकीय मतभेद विसरून सर्वांनी एकत्र येवून, चांगल्या भावनेनं राजकारण करु”, असं मत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.

”भलीही पक्षांची विचारधारा वेगवेगळी असली, पक्षबांधणीसाठी प्रयत्न करत असले तरी कोणत्या प्रकारचा वैयक्तिक आकस मनात नसतो.  एकमेंकावरील आरोप हे शहराच्या विकासासाठी असतात त्यात कोणत्याही प्रकारचा मन भेद नसतो”, अशी भावना माजी   महापौर प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.

या फराळाच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष . प्रशांतदादा जगताप, मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे, सभागृह नेते गणेश बीडकर आणि काँग्रेसचे गटनेते आबा बागुल सतीश देसाई , श्रीकांत शिरोळे, गोपाळ चिंतल आणि ,संदीप खर्डेकर उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

इन्स्टावर ओळख, परदेशात पायलट असल्याचं सांगून पुणेकर महिलेला 10 लाखांना गंडा

रेल्वेत नोकरीच्या आमिषाने चौघांना गंडा, पिंपरीत आरोपीकडून 26 लाखांची फसवणूक