Amit Shah : सर्वात व्यस्त गृहमंत्र्यांचा दोन दिवस पुणे दौरा, एका कार्यक्रमाशिवाय सर्व वेळ राखीव, पण कोणासाठी?

| Updated on: Aug 06, 2023 | 8:17 AM

Pune Amit Shah tour : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यासाठी दाखल झाले आहेत. दोन दिवसांच्या या दौऱ्यात त्यांचा फक्त एकच कार्यक्रम आहे. इतर सर्व वेळ राखीव आहे. हा वेळ कोणासाठी? ही चर्चा सुरु झालीय.

Amit Shah : सर्वात व्यस्त गृहमंत्र्यांचा दोन दिवस पुणे दौरा, एका कार्यक्रमाशिवाय सर्व वेळ राखीव, पण कोणासाठी?
Amit shah
Follow us on

रणजित जाधव, पुणे | 6 ऑगस्ट 2023 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी संध्याकाळी पुणे शहरात दाखल झाले आहेत. अमित शाह दोन दिवसांचा पुणे दौऱ्यावर आहेत. रविवारी त्यांचा सहकार विभागाकडून आयोजित एक कार्यक्रम आहे. याशिवाय त्यांचा पुणे शहरात दुसरा कोणताही कार्यक्रम नाही. दोन दिवसांचा दौऱ्याच इतर सर्व वेळ राखीव ठेवला आहे. अमित शाह केंद्रीय गृहमंत्री आहेत. सर्वात व्यस्त व्यक्ती आहेत. यामुळे दोन दिवस कोणत्याही कार्यक्रमाशिवाय ते पुणे शहरात कसे थांबले? ही चर्चा सुरु झाली आहे. शरद पवार यांना धक्का देण्यासाठी तर हा राखीव वेळ नाही ना? याबाबत राजकीय चर्चा सुरु झालीय.

काय घडताय पडद्यामागे

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दाखल झाल्यानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. रात्री उशिरापर्यंत तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. अजित पवार यांनी शरद पवार यांच्यापासून वेगळी भूमिका घेत भाजप-शिवसेना सोबत येण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अमित शाह यांचा हा पहिलाच पुणे दौरा आहे. यामुळे पुणे शहर अन् जिल्ह्यात भाजप अधिक मजबूत कसे करता येईल? अजित पवार यांच्या माध्यमातून सहकारात भाजपचा कमळ उभारता येईल का? अजित पवार गटासोबत आलेल्या आमदारांची संख्या वाढवता येईल का? या सर्व बाबींवर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मिशन ४५ वर चर्चा

पुणे येथील जे डब्लू मेरीट हॉटेल अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेतली. रात्री अकरा वाजेपासून उशीरापर्यंत या तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरु झाली. त्यात राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तार, भाजपचे मिशन ४५ आदी मुद्यांचा समावेश होता.

हे सुद्धा वाचा

रविवारी अमित शाह भाजप नेते अन् पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. यासाठीच त्यांचा वेळ राखीव ठेवण्यात आला आहे. बहुराज्यीय सहकारी संस्थांसाठी तयार करण्यात आलेल्या वेब पोर्टलचे उद्घाटन अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. पिंपरी-चिंचवडमधील रामकृष्ण मोरे सभागृहात दुपारी बारा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत.