Amit Shah : दगडूशेठ हलवाई मंदिरात दर्शन ते भाजपचा मेळावा, अमित शाहांच्या दौऱ्याचा कार्यक्रम एका क्लिक वर

| Updated on: Dec 19, 2021 | 7:21 AM

अमित शाह (Amit Shah) यांच्या महाराष्ट्र (Maharashtra ) दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. अमित शाह आज (Amit Shah in Pune) पुण्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

Amit Shah : दगडूशेठ हलवाई मंदिरात दर्शन ते भाजपचा मेळावा,  अमित शाहांच्या दौऱ्याचा कार्यक्रम एका क्लिक वर
अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री
Follow us on

पुणे: केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या महाराष्ट्र (Maharashtra ) दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. अमित शाह आज (Amit Shah in Pune) पुण्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. पुणे महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला देखील ते उपस्थित राहतील, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

अमित शाह यांचे दिवसभरातील कार्यक्रम

अमित शाह आज पुण्यात असून ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शन घेतील. त्यानंतर पुणे CFSL कॅम्पस येथे नवीन इमारमतीचं उद्घाटन करतील. अमित शाह यांचा दुपारी NDRF जवानांसोबत स्नेह भोजनाचा कार्यक्रम असेल. AMNICOM संस्थेच्या दीक्षांत समारंभाला ते उपस्थित लावतील. यानंतर सांयकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पायाभरणी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं लोकार्पण अमित शाह यांच्या हस्ते करण्यात येईल.महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं भाजप पुणे शहर कार्यकर्ता संमेलनात ते मार्गदर्शन करतील. अमित शाह या कार्यक्रमानंतर दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या घरी जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करतील.

अमित शाह यांचा संपूर्ण दौरा

कार्यक्रम वेळ
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर दर्शन सकाळी 10 वाजता
पुणे CFSL कॅम्पस येथे नवीन इमारमतीचं उद्घाटन सकाळी 11 वाजता
NDRF जवानांसोबत स्नेह भोजनदुपारी 1 वाजता
VAMNICOM चा दीक्षांत समारंभ दुपारी 2 वाजता
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पायाभरणी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं लोकार्पण पुणे महापालिका दुपारी 3.45 वाजता
भाजपा पुणे शहर कार्यकर्ता संमेलन गणेश कला क्रीडा केंद्र सायंकाळी 4.40 वाजता
बाबासाहेब पुरंदरे यांच्या घरी जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करणे सायंकाळी 6.45 वाजता

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. अमित शाह दोन दिवस शिर्डी आणि पुणे दौऱ्यावर असतील, अशी माहिती आहे. अमित शाह आज शिर्डीत येणार असून साईबाबांचे दर्शन घेणार असल्याची माहिती आहे. यानंतर अमित शाह सहकार परिषदेला उपस्थित राहतील. सहकराची सुरूवात झालेल्या प्रवरा येथे देशाची पहिली सहकार परिषदेत होणार असून विचारमंथनही होणार आहे.

सहकार मंत्री झाल्यावर अमित शाह पहिल्यांदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं केंद्रीय सहकार मंत्रालयाची स्थापना केल्यानंतर त्याची जबाबदारी अमित शाह यांच्याकडे देण्यात आली. अमित शाह यांनी केंद्रीय सहकार मंत्रालयाची जबाबदारी स्वीकरल्यानंतर ते पहिल्यांदाच महाराष्ट्रात आले आहेत. अहमदनगर येथील प्रवरानगर येथील सहकार परिषदेनंतर अमित शाह मुंबईतील एका कार्यक्रमाला उपस्थित होते. आज ते पुणे दौऱ्यावर असतील.

इतर बातम्या:

चालू आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात तेजी, काय आहेत आजचे दर?

Maharashtra News Live Update : नाशिकमध्ये सुरू झालेली सिटीलिंक स्मार्ट शहर बससेवा तोट्यात

 

Amit Shah Maharashtra Visit live Pune tour all programmes on one click check details