अभिजित पोते, पुणे : राज्यातील राजकारणात अजित पवार यांनी मोठा भूकंप घडवून आणला. रविवारी दुपारी त्यांनी आपला वेगळा गट तयार करत राज्यातील सत्तेत वाटा मिळवला. त्यांच्यासोबत नऊ आमदारांनीही शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यात प्रफुल्ल पटेल यांच्यासह अनेक जण होते. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील खासदारसुद्धा होते. परंतु आता शरद पवार पुन्हा मैदानात उतरले आहेत. त्यांनी अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या सर्वच नेत्यांना फोन केले आहे. शरद पवार यांचा मैदानात उतरल्याचा परिणाम दिसून येत आहे. काल अजित पवार यांच्यासोबत असलेला खासदार आता शरद पवार यांच्यासोबत आला आहे.
अजित पवार यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असलेला खासदार काही तासांत शरद पवार यांच्या गटात आला आहे. शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे आता शरद पवार यांच्यासोबत आले आहेत. त्यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. अमोल कोल्हे यांनी लिहिलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है … पर दिल कभी नहीं।” मी साहेबांसोबत.
जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है … पर दिल कभी नहीं।#मी_साहेबांसोबत @NCPspeaks @PawarSpeaks @Jayant_R_Patil @supriya_sule @Awhadspeaks @TV9Marathi @SakalMediaNews @abpmajhatv @mataonline @SaamanaOnline @SarkarnamaNews @thodkyaat… pic.twitter.com/2kAhkkfnjd
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) July 3, 2023
अमोल कोल्हे परत आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले आहे. पहिला मोहरा परत आला, असे त्यांनी ट्विट करत म्हटले आहे. आता अनेक जण परत येणार असल्याचा दावा त्यांनी केला. अनेक जणांनी आपली दिशाभूल झाली होती, असा दावा केल्याचे त्यांनी सांगितले. आपण उद्या शरद पवार यांची भेट घेणार आहे. त्यानंतर प्रतिक्रिया देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हिंगोलीचे आमदार राजू नवघरे हे शरद पवार यांच्या गटात दाखल झाले आहे. काल ते अजित पवार यांच्याबरोबर होते. परंतु ज्या व्यक्तीने आपणास मोठे केले, त्यांना कसे सोडावे? हा प्रश्न करत आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे त्यांनी सांगितले.
पहिला मोहरा परत..! https://t.co/AI6S5u5sEO
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 3, 2023
शरद पवार यांनीही रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक जण परत येणार असल्याचा दावा केला होता. तो दावा आता खरा होऊ लागला आहे. आता अजून कोण शरद पवार यांच्या गटात येणार? हे काही कालावधीत स्पष्ट होणार आहे.