पुणे : आज अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) आहे. लाडक्या बप्पाला निरोप देण्याची वेळ आलीये. पुण्यातील (pune) गणेशोत्सव (Ganeshotsav) राज्यासह देशभरात प्रसिद्ध असतो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरातून भव्य विसर्जन मिरवणुका निघतात. या मिरवणुका पहाण्यासाठी भाविक राज्याच्या काणाकोपऱ्यातून येत असतात. पुण्यात विसर्जन मिरवणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. मंडईतील टिळक पुतळ्यापासून सकाळी 10.30 वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. मंडईमध्ये विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत तसेच बाप्पाच्या मिरवणुकीसाठी पायघड्या देखील टाकण्यात आल्या आहेत.
पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती प्रसिद्ध आहे. गणेशोत्सव काळात राज्यभरातून या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविक येत असतात. थोड्याचवेळात दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती उत्सव मंडपातून मंदिरामध्ये विराजमान झाला आहे.
गुरुजी तालीम गणेशमंडळाचा गणपती हा पुण्यातील तीसरा मानाचा गणपती आहे. थोड्याच वेळात गुरुजी तालीम गणेशमंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. गणेशमंडळाकडून विसर्जन मिरवणुकीसाठी खास विठ्ठल रुक्मिणीचा देखावा उभारण्यात आला आहे. हा देखावा भाविकांचे लक्ष वेधून घेतोय. देखाव्यात गणपती विराजमान झालाय. फुलांची आकर्षक सजावट देखील करण्यात आली आहे.
तुळशीबागचा गणपती हा पुण्यातील मानाचा चौथा गणपती आहे. मानाचा चौथा गणपती असलेल्या तुळसीबाग गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला थोड्याचवेळात सुरुवात होणार आहे. मिरवणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. आकर्ष अशी सजावट करण्यात आली आहे. रथाची आकर्ष सजावट आणि बप्पाची मूर्ती विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत.