पिंपरी – कोरोना, ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेची(Pimpri-Chinchwad Municipal Corporation) सार्वत्रिक निवडणूक (Election )लांबणीवर गेली आहे. त्यामुळे 13 मार्च पासून महापालिकेवर प्रशासकीय राजवट असणार आहे. महापालिका प्रशासकपदी आयुक्त राजेश पाटील (Commissioner Rajesh Patil)यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांचा पाच वर्षाचा कार्यकाळ 13 मार्च 2022 रोजी संपुष्टात येत आहे. त्यापूर्वीच निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक होते. परंतु, कोरोना, ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणामुळे महापालिका निवडणूक वेळेत झाली नाही. निवडणूक लांबणीवर गेली आहे. त्यामुळे 13 मार्चनंतर महापालिकेवर प्रशासक राजवट असणार आहे.
महापालिका निवडणुकांच्या दृष्टीकोनातातून तयार करण्यात आलेली प्रभागरचना राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आली आहे. प्रभागरचनेस राज्य निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाल्यानंतर ही प्रभागनिहाय मतदार यादी अंतिम केली जाणार आहे. प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा जाहीर केल्यानंतर प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेस दिले होते. त्यासाठी पिंपरी,चिंचवड,भोसरी विधानसभा मतदार संघातील मतदारांच्या मूळ याद्या व पुरवणी यादी वापरून कामकाज करण्यात आले आहे.
पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीच्या प्रारुप प्रभागरचनेवरील हरकतींवर प्राधिकृत अधिकाऱ्यांमार्फत सुनावणी झाली. सुनावणीनंतर आवश्यक शिफारशींसह अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे महापालिकेने सादर केला आहे. त्यामुळे आता अंतिम प्रभागरचना आणि आरक्षण सोडत जाहीर कधी होणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बाबांनी विवाह ठरवला, तरुणीचा प्रियकरामागे लग्नासाठी तगादा, संतापलेल्या बॉयफ्रेण्डचं टोकाचं पाऊल