मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप आहे. आज या प्रकरणी ते पुणे सत्र न्यायालयात हजर झाले. यावेळी पुणे कोर्टाने त्यांना दिलासा दिला. त्याचवेळी समज सुद्धा दिली. पुणे न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांचं अटक वॉरंट रद्द केलं. मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात प्रथम न्यायदंडाधिकारी ए.सी.बिराजदार यांनी हे अटक वॉरंट काढलं होतं. सरकारी वकिलांनी हे अटक वॉरंट रद्द करण्यास विरोध केला. कोर्टाने मनोज जरांगे पाटील यांचं अटक वॉरंट रद्द केलं असलं, तरी त्यांना समज सुद्धा दिली आहे.
कोर्टाचा अवमान होईल अशा पद्धतीची वक्तव्य टाळावीत अशा समज आपणास देत आहोत असं कोर्टाने म्हटलं आहे. पुणे कोर्टाने, मनोज जरांगे पाटील यांना नव्याने बंद पत्र कोर्टाला द्यायला सांगितलं आहे. त्याशिवाय आजमीनपात्र अटक वारंट रद्द होणार नाही.
काय आहे फसवणुकीच प्रकरण?
मनोज जरांगे पाटील यांच्यावर नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप. कोर्टात हजर न राहिल्यामुळे जरांगेंविरोधात अटक वॉरंट जारी झालं होतं. 2013 मध्ये जालन्यात धनंजय घोरपडे यांच्या शंभूराजे नाटककाच्या 6 प्रयोगांचा आयोजन करण्यात आलं होतं. मनोज जरांगे, अर्जुन जाधव आणि दत्ता बहीर यांनी हे आयोजन केलं होतं. प्रत्येक प्रयोगाला 5 लाख याप्रमाणे 30 लाख रुपये देण्याच आयोजकांनी कबूल केल्याच घोरपडेंचा दावा आहे.