पुणे : “शेतकरी, बियाणे, खते, पिक वीमा, वीज, पाऊस, पुर, कोरोना, लॉकडाऊन, अडचणी आलेले अलुतेदार, बलुतेदार, व्यापारी, मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षण असे राज्यासमोर अनेक प्रश्न आ-वाचून उभे आहेत. मात्र, सगळे प्रश्न कोमात आणि सरकारमधील तीन पक्षांमध्ये स्वबळाची छमछम जोमात, असे चित्र राज्यात आहे,” अशी खरमरीत टीका भाजप नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी केली. ते आज (21 जुलै) पुणे आणि पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत. यावेळी संघटनात्मक आढावा बैठका घेतल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
आशिष शेलार म्हणाले, “रोज सकाळ-संध्याकाळ तीन पक्षांमध्ये एकच चर्चा ती म्हणजे आम्ही “स्वबळावर लढणार, आम्ही स्वबळावर लढणार. एक म्हणतो आम्ही स्वबळावर लढणार, दुसरे त्यावर अग्रलेख लिहिणार, मग तिसरे दुसऱ्याला भेटायला जाणार, मग सगळे एकत्र भेटतात. ही अशी सगळी स्वबळाची छमछम सोडली, तर राज्यात दुसरे काहीच ऐकायला येत नाही. हा दुसरे काही येत असेल तर लेडीज बारची छमछम ऐकू येते. हे मिडियानेच काल उघड केलं. राज्यासमोर अनेक गंभीर प्रश्न असून त्यावर चर्चा करण्याची सरकारची तयारी नाही.”
माझी हळूहळू खात्री पटत चालली आहे की अझरबैजान आणि रवांडाच्या सरकारांनी राहुल गांधी आणि प्रशांत किशोर यांचे फोन टॅप केले होते.
कर्नाटकात कुमारस्वामी सरकार पाडण्यात मोरोक्कोचा हात होता.#पेगासस
— Dr. Nitin Raut (@NitinRaut_INC) July 21, 2021
“महिलांवरील अत्याचार, गुन्हेगारीने कळस गाठला आहे. पोलीस अधिकाऱ्यांमध्ये वॉर सुरू आहे. मात्र मंत्री रोज सकाळी उठतात “सरकार 5 वर्षे टीकणार” हा जप पहिल्यांदा सर्व मंत्री 108 वेळा करतात, मग स्वबळ असे सारे दुर्दैवी चित्र आहे. पुण्यात भूखंडाचे श्रीखंड पार्ट 2 सुरू असून पुणे पीएमआरडीए करुन काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून सुरु आहे. 50 हजार कोटींचे भूखंड या प्राधिकरणाकडे गेले कसे? या समितीत भाजपचे आमदार का नाहीत? यातून एक मोठा घोटाळा केला जात आहे. आम्ही तेही योग्य वेळी ऊघड करु,” असा इशारा आशिष शेलार यांनी दिला.
Ashish Shelar criticize MVA government over Dance Bar and dispute between alliance