पुणे- श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे (वय 65) यांचे निधन झाले आहे. यकृताच्या कर्करोग या दुर्धर आजारासोबतची त्यांची झुंज अखेर काल (सोमवारी) थांबली. त्यांच्यावर मागील दोन आठवडयांपासून ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान असलेल्या गोडसे यांच्या जाण्याने सामाजिक क्षेत्रातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांच्यामागे त्यांची पत्नी 1 मुलगी, 1 मुलगा, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. गेली 50 ते 55 वर्षे ट्रस्टच्या माध्यमातून ते कार्यरत होते. तसेच सुवर्णयुग सहकारी बँकेवर संचालक पदी देखील त्यांनी काम केले होते.
मानवतेचे महामंदिर हे संकल्पना रुजवली
अशोक गोडसे सामाजिक क्षेत्रात कायम सक्रिय असत. त्यांनी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या माध्यमातून ‘मानवतेचे महामंदिर’ ही संकल्पना रुजवित अनेक सामाजिक उपक्रम राबवले. ससून सर्वोपचार रुग्णालायसोबत एकत्रित काम करत दुर्धर आजारांसह महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अनेक उपाययोजना राबवल्या. गरजू तसेच गरीब लोकांना मोफत व कमी दारात उपचार त्यांनी मिळवून दिले होते.
ही अभियाने राबवली
दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून त्यांती अनेक समाजपयोगी कामे केली.
जय गणेश निसर्ग संवर्धन अभियान या ट्रस्टच्या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. दरवर्षी होणा-या गणेशोत्सव सजावटीच्या संकल्पनेत त्यांचा महत्त्वाचा सहभाग असायचा.
अशोक गोडसे यांचा जीवनप्रवास
Weight Loss Tips : वजन कमी करायचे आहे? मग ‘या’ फक्त 6 टिप्स फाॅलो करा आणि स्लिम-ट्रिम व्हा…
कामावर हजर असलेल्यांनाच पगार मिळणार; एसटी कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्र्यांचा इशारा
MLC Election : नागपूरमध्ये काँग्रेसच्या अडचणीत वाढ, बसपा पाठोपाठ एमआयएमच्या निर्णयानं टेन्शन वाढलं