पुणे : पुणे विमानतळावर (Pune AirPort) विमान कंपनीचे कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये जोरदार हंगामा झाला. विमानाची वेळ झाली होती. यामुळे प्रवाशांना विमानात बसवण्यात आले. त्यानंतर विमान गरम झाल्याचे कारण देत उतरवण्यात आले. दुपारी असणारी ही फ्लाइट संध्याकाळी रद्द झाल्याचे सांगण्यात आले. यामुळे स्पाईसजेट कंपनीचे (Spicejet)कर्मचारी व प्रवाशांमध्ये वादावादी झाली. पाच तासांच्या उशिरानंतर विमान रद्द झाल्यामुळे प्रवाशी चांगलेच संतापले होते.
पुणे येथून अहमदाबादला जाणारे विमान दुपारी अडीच वाजता उड्डाण करणार होते. परंतु काही कारणामुळे ते टेक ऑफ करू शकले नाही. प्रवासी विमानतळावर विमानाची वाट पाहत थांबवले होते. त्यानंतर संध्याकाळी 7.15 वाजता विमान रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. विमानतळावर विमानाच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांच्या संयमाचा बांध फुटला. त्यानंतर स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांशी त्यांची वादावादी झाली. तत्पूर्वी, विमानात प्रवाशांना बसवल्यानंतर विमान गरम झाले. यामुळे प्रवाशांना खाली उतरवण्यात आले.
पुणे दिल्ली विमानाला उशीर
पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या गोफर्स्टच्या विमानास उशीर झाला. बोर्डिंग गेटवरील काउंटरवर एकही कर्मचारी नव्हता. यामुळे संध्याकाळी ७.४० वाजता विमानात चढण्याचे सांगण्यात आले.
यापुर्वी झाला निष्काळजीपणा
यापुर्वी १२ जानेवारीलाही स्पाईसजेट या विमान कंपनीचा निष्काळजीपणाचा प्रकार समोर आला होता. त्यावेळी दिल्ली विमानतळावर, प्रवाशांना बोर्डिंग गेट आणि बेंगळुरूला जाणार्या फ्लाइटमध्ये एक तासापेक्षा जास्त वेळ थांबायला लावलं होतं.सौमिल अग्रवाल नावाच्या ट्रॅव्हल ब्लॉगरने यासंदर्भात पोस्ट लिहिली होती.