पुणे: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर उपचार करत असून ते उपचारांना साथ देत नसल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बरी नव्हती. त्यामुळे त्यांना कोथरुडच्या दीनानाथ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. गेल्या तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. बाबासाहेबांनी वयाची शंभरी गाठली आहे. वार्धक्यामुळे ते उपचारालाही प्रतिसाद देत नसल्याचं त्यांच्यावर डॉक्टरांनी सांगितलं. डॉक्टरांची एक विशेष टीम त्यांच्यावर गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार करत आहेत.
काही महिन्यांपूर्वी बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाची शंभरी गाठली होती. त्यावेळी झालेल्या दोन ते तीन कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही घरी येऊन पुरंदरे यांना शुभेच्छा दिल्या होत्या. दोन ती कार्यक्रम वगळता त्यांनी नंतर कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावली नव्हती. दिवाळी निमित्त होणाऱ्या शस्त्र पूजन कार्यक्रमालाही ते हजर राहिले नव्हते. पहिल्यांदाच ते या कार्यक्रमाल हजर राहिले नव्हते.
बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाची शंभरी गाठल्याने 14 ऑगस्ट 2021 रोजी पुण्यात एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या हस्ते बाबासाहेब पुरंदरे यांचा सत्कार करण्यात आला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, इतिहासकार गजानन मेहेंदळे, आमदार आशिष शेलार हे देखील यावेळी उपस्थित होते. यावेळी राज यांनी बाबासाहेबांचं आपल्या खास शैलीत गौरव केला होता. मी 6 वर्षांचा असताना पहिल्यांदा बाबासाहेब पुरंदरे या व्यक्तीला पाहिलं. त्याच्यानंतर कित्येक वर्षे मी त्यांना फक्त पाहत होतो, वाचत होतो. आता मला त्यांचा सहवास लाभला. बाबासाहेब इतिहास जरी सांगत असले तरी ते वर्तमानात भानावर यायला शिकवतात. इतिहासात ज्या चुका केल्या, त्या वर्तमानात करू नये हे सांगतात. इतिहासाबरोबर वर्तमानाची जाग आणणारा इतिहास बाबासाहेब सांगतात, असं राज म्हणाले होते.
बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म 29 जुलै 1922 रोजी पुणे येथे झाला. 17 वर्षाचे असताना त्यांनी शिवाजी महारांजावर गोष्टी लिहिल्या. या गोष्टी ‘ठिणग्या’ नावाच्या पुस्तकाच्या रुपात सर्वांसमोर आल्या. यानंतर त्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ आणि ‘नारायण राव पेशवा’ यांच्यावर ‘केसरी’ नावाचे पुस्तक लिहिले. यासोबतच पुरंदरेंनी लिहिलेले ‘जाणता राजा’ नाटकही महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध झाले आहे. या नाटकाचे हिंदीतही अनुवाद करण्यात आले आहे. फडणवीस सरकारने बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला होता.
VIDEO : 36 जिल्हे 50 बातम्या | 14 November 2021https://t.co/uh7UMS8RYO#36JILHE50BATMYA #36district50news #MarathiBatmya
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 14, 2021
संबंधित बातम्या:
100 नक्षल्यांशी सामना, 26 जणांना कंठस्नान, गडचिरोलीच्या जंगलात नेमकं ऑपरेशन कसं राबवलं गेलं?