पुणे शहरात बच्चू कडू यांच्या प्रतिमेला का घातला दुग्धाभिषेक?

| Updated on: Mar 26, 2023 | 2:43 PM

पुणे शहरात प्रहास संघटना आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. काल राष्ट्रवादीने बॅनर लावले होते. आज प्रहार संघटनेकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निषेधाच्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.

पुणे शहरात बच्चू कडू यांच्या प्रतिमेला का घातला दुग्धाभिषेक?
Image Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us on

पुणे : सुरत सत्र न्यायालयानं राहुल गांधींना (Rahul Gandhi) शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यांची खासदारकी रद्द झाली. त्याचे पडसाद राज्यात उमटत आहेत. आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांना काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. त्यामुळे पुण्यात बच्चू कडू यांच्याविरोधात बॅनरबाजी करण्यात आलीय. “बच्चू कडू यांची आमदारकी कधी रद्द होणार? नियम सर्वांना सारखेच असले पाहिजेत. निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान. अपना भिडू.. बच्चू कडू”, असा मजकूर संबंधित बॅनरवर आहे. पुण्यातल्या पाषाण परिसरात लागलेल्या या बॅनरनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. हे बॅनर राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं लावले आहे. त्यावर रविवारी प्रहार संघटनेकडून उत्तर देण्यात आले.

प्रहार संघटनेकडून उत्तर

हे सुद्धा वाचा


बच्चू कडूंना सुद्धा न्यायालयाने शिक्षा सुनावली असून त्यांची देखील आमदारकी रद्द करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत होती. त्याच्याच विरोधात आज प्रहार संघटनेने आंदोलन केल आहे. पुण्यात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बच्चू कडू यांच्या समर्थनात त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात आंदोलन केले आहे. पुण्यातील बालगंधर्व चौकात बच्चू कडू यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत अपंग हृदय सम्राट असा बच्चू कडू यांचा उल्लेख देखील या कार्यकर्त्यांनी केला आहे.

राष्ट्रवादीच्या विरोधात घोषणा


प्रहार संघटनेकडून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निषेधाच्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. बच्चू कडू यांनी अपंगासाठी आंदोलन केले होते. त्यावर आंदोलनावर गुन्हे दाखल झाले होते. त्यावर नाशिक न्यायालयाने बच्चू कडू यांनी शिक्षा दिली होती. परंतु हे अपंगासाठी केलेल्या आंदोलनामुळे शिक्षा झाली होती, असे प्रहार संघटनेचे संतोष साठे यांनी सांगितले.

बच्चू कडू यांचा पलटवार

राष्ट्रवादी काँग्रसनं लावलेलं हे बॅनर पाहून बच्चू कडूंनी पलटवार केलाय. राष्ट्रवादीनं हे कृत्य अज्ञानातून केल्याचं बच्चू कडूंचं म्हणणं आहे. “बॅनर लावणारे कार्यकर्ते अतिउत्साही आहेत. ते म्हणाले,  300 वर्षे आधी अंगावर जितक्या जखमा असायच्या ना छत्रपतींच्या काळात दागिना समजला जात होता. स्वातंत्र्याच्या पूर्वी जितक्या वेळा जास्त जेलमध्ये गेले तो त्यांचा दागिना होता.  बच्चू कडूने स्वत:साठी आंदोलन केलं नाही. माझे आंदोलन अपंग, दिव्यांग, शेतकऱ्यांसाठी होते. त्याच्यात मला शिक्षा सुनावली गेलीय. एका गुन्ह्यात 1 आणि दुसऱ्या गुन्ह्यात 1, अशी 2 वर्षे मिळून 1 वर्षे शिक्षा आहे.