पुणे | 10 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहरात एक वेगळाच प्रकार उघड झाला आहे. पुणे येथील बुधवार पेठेतून हा प्रकार समोर आला आहे. पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने केलेल्या छापेमारीत हा प्रकार समजला आहे. पुण्यात बांगलादेशातून काही तरुणींना बोलवण्यात आले होते. त्या तरुणींना त्यांच्या त्वचेवर उपचार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मग त्या विमानाने पुणे शहरात आल्या. परंतु त्यानंतर त्यांच्यासोबत जे काही घडले ते सामाजिक सुरक्षा विभागाने उघड केले. या प्रकरणी सात जणांना अटक झाली आहे.
पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने मंगळवारी मोठी कारवाई केली. या विभागाने बुधवार पेठेत सात बांगलादेशी महिलांना अटक केली. त्यानंतर त्यांच्याकडून जी माहिती उघड झाली ती धक्कादायक आहे. या तरुणींची फेसबुकवर ओळख झाली होती. मग त्या लोकांना तुमच्या चेहऱ्यावर आणि त्वचेवर भारतात चांगली ट्रिटमेंट होईल. तुम्ही पुण्यात या…असे सांगितले. त्यानंतर त्या तरुणी विमानाने कोणतीही कागदपत्रे नसताना पुण्यात आल्या. परंतु त्यांना कुंटणखान्यात बसवण्यात आले.
पुणे पोलिसांनी गेल्या महिन्याभरात ही तिसरी कारवाई केली आहे. पुणे हा बांगलादेशी महिलांचा अड्डा बनला आहे. बुधवार पेठेतील कुंटणखान्यात त्या मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळे पुणे येथील बुधवार पेठेत राहणाऱ्यांवर पोलिसांची नजर असते. आता सलग तिसऱ्यांदा बांगलादेशी महिलांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईच्या वेळी सात जणांना अटक केली. त्या बांगलादेशी महिलांकडे भारतात येण्यासाठी कोणतेही अधिकृत कागदपत्रे नव्हती.
पुणे शहरात बांगलादेशी नागरिक वाढले आहेत. पोलिसांकडून बांगलादेशी घुसखोरांवर अधुनमधून कारवाई होते. परंतु या कारवाईत सातत्य नाही. त्यामुळे बांगलादेशी नागरिक बिनधास्तपणे घुसखोरी करतात. पुणे पोलिसांनी ही कारवाई सातत्याने केल्यास घुसखोरांवर प्रतिबंध बसणार आहे. पोलिसांनी संपूर्ण शहरात घुसखोरांविरोधात मोहीम सुरु केली तर अनेक घुसखोर सापडणार आहे. काही जण बनावट कागदपत्रे तयार करुन राहत आहे.