जयवंत शिरतर , जुन्नर- ऐतिहासिक दृष्टया महत्त्वपूर्ण तालुका म्हणून जुन्नर(Junnar) ओळखला जातो. मात्र याच तालुक्यात आता बिबटयावरून(leopard) चांगलेच राजकारण पेटणार असल्याचे चित्र दिसत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकतेच यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये बिबट सफारीचा पायलट प्रोजेक्ट बारामतीला जाणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर जुन्नर तालुक्यातील शिवसेना नेते तसेच स्थानिक नागरिकांनी या गोष्टीला आक्षेप घेतला आहे. ज्या तालुक्याने गेल्या कित्येक वर्षांपासून बिबट्या आणि माणसांमध्ये संघर्ष होत आला आहे. अनेकदा वन विभागाच्या (Forest Department) मदतीने हा संघर्ष मिटवण्यात आला. या तालुक्यात बिबट्यांची संख्याही लक्षणीय होती अन आताही आहे. उसाच्या फडात बिबट्यांची पिल्ले सापडल्यानंतरही त्या पिल्लांना वन विभागाच्या माध्यमातून पोहचविण्याचे काम जुन्नर तालुक्यातील नागरिकांनी केला आहे.त्यामुळे बिबट ही जुन्नर तालुक्याची ओळख आहे. त्यामुळे बिबट सफारी जुन्नर तालुक्यात व्हावी अशी मागणी शिवसेनेकडून 2015 पासून होत आहे.
बिबट्या च्या बाबतीत धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे होते. ही भूमिका लक्षात ठेऊन तत्कालीन काळात बिबट सफारीचा प्रकल्प आधिवेशनात मांडला होता. आंबेगाव येथे याबाबत पाहणी झाली होती.हा सर्व पत्रव्यवहार पटलावर असताना देखील , जुन्नरच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी याबाबत कुठल्याही प्रकारची ही बिबट सफारी होण्यासाठी कारवाई केली नाही .हे मोठे या जुन्नर तालुक्याचे शल्य आहे. हा बिबट प्रकल्प येथून गेला तर तालुक्याची अस्मिता आणी उर्जा संपुष्टात येईल. याबाबत उपमुख्य मंत्री अजित दादाना पत्रव्यवहार केला आहे.
“बारामती हा बिबटचा विषय होऊ शकत नाही .तसेच शिवसृष्टी देखील बारामतीचा विषय होऊ शकत नाही.त्यामुळे हे कारण नसताना आमच्यावर लादल जातय.उपमुख्यमंत्री साहेब..जे तुमच्याकडे आहे त्याची ताकद समाजापुढे आहे.मात्र जे आमच आहे त्याच्यावर आतिक्रमण करू नका असा इशारा जुन्नरचे शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनवणे यानी दिला आहे.त्यामुळे तालुक्यातील बिबट सफारीचे राजकारण नक्कीच रंगणार यात तिळमात्र शंका नाही.
खेडमध्ये महिलेची सरपंच पदावर निवड होताच ; गुलाल उधळत अन जेसीबीतून काढली मिरवणूक