योगेश बोरसे, पुणे : येथील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक प्रदीप कुरुलकर पाकिस्तानी हसीनाच्या हनी ट्रॅपमध्ये अडकला होता. मे महिन्यात त्याचे हे प्रकरण उघड झाले. त्यानंतर त्याला अटक झाली. या प्रकरणाचा तपास एटीएसकडे देण्यात आला. एटीएसने प्रदीप कुरुलकर याची कसून चौकशी केली. भक्कम पुरावे जमा केले. त्यानंतर त्याच्यावर पुणे जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. दोन हजार पानांच्या या दोषरोपपत्रात अनेक खुलासे केले आहे. यानंतर आणखी एक आरोप प्रदीप कुरुलकर याच्यावर होत आहे. त्यामुळे त्याच्या अडचणी वाढणार आहेत.
डीआरडीओचा माजी संचालक प्रदीप कुरुलकर याच्याबाबतीत आणखी एक नवीन खुलासा झाला आहे. प्रदीप कुरुलकर महिलांचे लैंगिक शोषण करीत असल्याची माहिती समोर आली आहे. प्रदीप कुरुलकर याने दोन महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप झाला आहे. डीआरडीओतील कंत्राट देताना महिलांचे शोषण केल्याची माहिती मिळाली आहे. पाकिस्तानी गुप्तहेर झारा दासगुप्ता हिच्याबरोबरचे कारनामे उघड होत असताना आणखी एक माहिती समोर आली आहे.
प्रदीप कुरुलकर याने पाकिस्तानी हसीनाशी केलेल्या चॅटची माहिती समोर आली आहे. हा चॅट दोषारोपपत्रात जोडला आहे. त्यात प्रदीप कुरुलकर याची झारा दासगुप्ताशी ओळख कशी झाली, तिला तो काय म्हणत होता, ही माहिती समोर आली आहे. प्रदीप कुरुलकर झारा दासगुप्ताला बेबी म्हणत होता.
प्रदीप कुरुलकर याने अनेक महत्वाची माहिती झारा दासगुप्ता या पाकिस्तानी गुप्तहेराला दिली. संरक्षण प्रकल्पात वापरण्यात येणाऱ्या साहित्याची रचना, गुजरातमधील संरक्षण कार्यक्रमात दाखवण्यात आलेले पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनची माहिती त्याने दिली. तसेच आपल्या काही क्षेपणास्त्रासंदर्भातही माहिती दिली.
प्रदीप कुरुलकर वेगवेगळे ॲप्स वापरत होता. झारा दासगुप्ताशी संवाद करण्यासाठी तो बिग चँट, क्लाऊड चॅटचा वापर करत होता. त्यामाध्यमातून दोघे संवाद करत होते. प्रदीप कुरुलकर याने झारा दासगुप्ताला सरफेस टू एअर मिसाईलबदल माहिती दिल्याची माहिती दिली आहे.