पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने चक्क भाजप नगरसेवकाला फ्लेक्स लावून शुभेच्छा दिल्या आहेत. भाजप नगरसेवक रवी लांगडे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीकडून हे फ्लेक्स लावले गेले आहेत. ‘आता वेळ बदलणार’ म्हणत पिंपरीतल्या नव्या राजकीय बदलाचे संकेत या फ्लेक्सच्या माध्यमातून देण्यात आले आहेत.
दुसरीकडे रवी लांडगे यांच्या फ्लेक्सवरुन मात्र स्थानिक नेत्यांचे फोटो गायब आहेत. त्यामुळे रवी लांडगे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. त्यामुळे खरंच फ्लेक्सवर म्हटल्याप्रमाणे पिंपरी चिंचवडमध्ये वेळ बदलून वारं फिरणार का? याची चर्चा पिंपरी चिंचवडच्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेत बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक रवी लांगडे यांच्या भोसरी प्रभागामध्ये राष्ट्रवादीच्या युवक विधानसभा अध्यक्षांनी रवी लांडगे यांना फ्लेक्स लावून शुभेच्छा दिल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून रवी लांगडे भाजपच्या कार्यकारणीवर नाराज आहेत. आपल्याला डाववलं जात असल्याची त्यांच्या मनात भावना आहे. मला सगळे पर्याय खुले आहेत. मी लवकरच पत्रकार परिषद घेऊन माझी पुढील भूमिका स्पष्ट करेन, असं रवी लांडगे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं.
तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या युवक विधानसभा अध्यक्ष, ज्यांनी हे फ्लेक्स लावले त्यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं, “रवी लांडगे यांचा 15 ऑगस्ट रोजी वाढदिवस असतो. दरवर्षी आम्ही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतो. यंदाही आम्ही फ्लेक्सच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राजकारण आणि नातेसंबंध यात कुठेही गल्लत करायला नको. राजकारण विरहित नाते जपायला हवीत, पण त्यांच्या राष्ट्रवादीतल्या प्रवेशाबाबत मी बोलणार नाही, त्यांचा निर्णय तेच जाहीर करतील”
(Birthday Greet to BJP corporator from NCP In Pimpari Chinchwad)
हे ही वाचा :
बाळासाहेबांकडून राजकारणात येण्याची ऑफर, लतादीदींचं ‘असं’ उत्तर परत बाळासाहेबांनी विषयही काढला नाही!