अभिजित पोते, पुणे | 7 डिसेंबर 2023 : राजकीय मैदान गाजवणारे नेते कधी क्रिकेटच्या मैदानात उतरले तर…परंतु जे चांगले खेळाडू असतात त्यांच्यासाठी खेळपट्टी महत्वाची ठरत नाही…भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे पुणे शहरात क्रिकेटच्या मैदानात उतरले. मग नेहमी राजकीय मैदानावर गाजवणारे बावनकुळे यांनी क्रिकेटचे मैदान गाजवले. क्रिकेटच्या मैदानावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची तुफान फटकेबाजी केली. बावनकुळे फलंदाजी करत असताना मुरलीधर मोहोळ, धीरज घाटे आणि इतर भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांना गोलंदाजी केली. मग आपलेच गोलंदाज असल्याचा विचार न करता बावनकुळे यांनी क्रिकेटच्या पिचवर दमदार बॅटींग केली.
पुणे शहरात भाजपाकडून क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. भाजप शहराध्यक्ष करंडक नावाने क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन झाले. पुणे शहर भाजपातील सर्व विधानसभा मतदारसंघातील खेळाडू या स्पर्धेत खेळणार आहे. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांची दमदार फलंदाजी केली.
राज्याच्या विधानसभेचे अधिवेशन आजपासून सुरु झाले. यावेळी मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत येणार आहे. स्पर्धेच्या उद्घघाटन केल्यानंतर माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी शिवरायांची शपथ घेऊन आरक्षण देण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे मराठा समाजास आरक्षण मिळणारच आहे. फक्त कुठल्या कायद्याने हे आरक्षण देता येईल, यासाठी प्रयत्न सुरू आहे. मनोज जरांगे पाटील आणि राज्यातील सगळ्या मंत्र्यांनी एकत्र आले पाहिजे. राज्यातील सर्वपक्षीय मराठे नेते आणि जरांगे यांनी एकत्र येऊन मराठा समाजाचा फायदा कशात आहे, हे बघितले पाहिजे.
माझ्या परिवारिक दौऱ्यात फोटो कापून फोटो मोर्फ करुन दाखवला गेला आहे. यासंदर्भात मी आधीच उत्तर दिले आहे आणि रोहित पवार यांना योग्य वेळी उत्तर देऊ. परंतु रोहित पवार यांना लवकर मोठं व्हायचंय आहे. त्यासाठी त्यांच्याकडे शार्टकट मार्ग आहे.