पुणे : मशिदीवरचे भोंगे काढणार नसाल तर आम्ही हनुमान चालिसाचे भोंगे वाजवू, अशी भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंना मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी पाठिंबा दिला, तर तुमची अडचण काय, असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला आहे. ते पुण्यात बोलत होते. अजानचा अर्थ काय तो समजून सांगायला हवा. जे नमाजला येत नाही, त्यांना येण्यास प्रवृत्त करा. मशिदींमध्ये भोंगे लावू शकता. त्याचा आवाज बाहेर जाता कामा नये. म्हणजेच नमाज (Namaz) अदा करणाऱ्यांसाठी आतमध्ये व्यवस्था करा. महिला अजानला येत नाहीत. तर त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था करावी. अलिकडे स्मार्टफोन आले आहेत. त्यामध्ये नमाज टाकला येईल. मात्र अशा मुद्द्यांमधून का वाद निर्माण केले जात आहेत, हे कळत नाही, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
शिवसैनिकांची सहानुभूती मारून मुटकून मिळवताहेत, अशी टीकादेखील चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. सर्वसामान्यांची सहानुभूती हनुमान चालिसाचा आग्रह धरणाऱ्या राज ठाकरेंविषयीच आहे. काय प्रॉब्लेम आहे यांचा हे समजत नाही. अजानच्या बाबतीत काही नियमावली आहे. मशिदींच्या आत ऐकायला काहीच समस्या नाही. मात्र ज्यांचा काहीच संबंध नाही, त्यांना तुम्ही कशाला ऐकवता, असा सवाल यावेळी त्यांनी केला.
माझ्या घरासमोर कोणी पूजा सांगायला आले तर मी म्हणेन बाहेर का, घरात या. आम्ही प्रसादाची सोय केली असती. अशी टीका त्यांनी केली. प्रत्येकवेळी भाजपावर टीका करतात. सध्या ऊन पण खूप आहे. यामागेसुद्धा भाजपाचा हात आहे असे म्हणतील, असेही ते म्हणाले. तर आम्ही घाबरणार नाहीत. आम्ही चळवळीतले लोक आहोत. कितीही हल्ले केले तरी घाबरणार नाही, असे ते म्हणाले.