राळेगणसिद्धी: शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपोषणाला बसणार आहेत. अण्णांनी उपोषण करू नये म्हणून भाजपच्या नेत्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केला आहे. आज भाजप नेत्यांनी सहाव्यांदा अण्णांची भेट घेतली. पण अण्णांचं मन वळवण्यात त्यांना यश आलं नाही. दिल्लीत झालेल्या बैठकीचा एक ड्राफ्टही अण्णांना देण्यात आला. मात्र तरीही अण्णांनी उपोषण करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे भाजपचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. (BJP leader Girish Mahajan meets anna hazare in ralegansiddhi today)
अण्णा हजारे यांनी उपोषणाचा निर्णय मागे घ्यावा म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार गिरीश महाजन यांनी राळेगणसिद्धीत जाऊन अण्णांची भेट घेतली होती. मात्र, अण्णाने निर्णय मागे घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर आज पुन्हा गिरीश महाजन यांची भेट घेऊन त्यांच्याशी पुन्हा चर्चा केली. यावेळी त्यांनी त्यांच्या मागण्यासंदर्भातील एक ड्राफ्ट त्यांना दिला. एमएसपीच्या संदर्भात एक उच्चाधिकार समिती स्थापन व्हावी, त्यातून निर्णय व्हावा अशी अण्णांची मागणी होती. काल देवेंद्र फडणवीस आणि मी दिल्लीत गेलो होतो. यावेळी आम्ही केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची भेट घेतली. त्यांना अण्णांची भूमिका सांगितली. या बैठकीला केंद्राचे सचिव होते. या बैठकीत काही निर्णय झाले. त्याचं प्रारुप घेऊन मी अण्णांकडे आलो होतो. त्यांना ते पत्रं दिलं आहे. त्यावर अण्णांनी सकारात्मक चर्चा केली. या समितीत कुणाला घ्यायचं यावर चर्चा झाली. आज उद्यापर्यंत हे प्रारुप पक्कं होईल, असं महाजन म्हणाले.
उच्चाधिकार समिती स्थापन करणार
अण्णांनी कृषी मालांचा हमी भाव ठरवण्यासाठी उच्चाधिकार समिती असावी, अशी मागणी केली होती. ही मागणी मान्य झाली आहे. ही समिती स्थापन करण्यात येणार असून त्यात कुणाला घ्यायचं याबाबत अण्णांशी चर्चा करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
तर केंद्रीय कृषी राज्यमंत्री अण्णांना भेटतील
अण्णांच्या प्रकृतीची पंतप्रधानांपासून देशाच्या गृहमंत्र्यांपर्यंत सर्वांनाच काळजी आहे. अण्णांचं वय पाहता त्यांनी उपोषण करू नये, असं सर्वांनाच वाटतं. त्यामुळे वेळ पडल्यास केंद्रीय कृषी राज्यमंत्री अण्णांना भेटायला येऊ शकतील. उद्या अंतिम पत्र घेऊन आम्ही परत राळेगणला येऊ. त्यामुळे अण्णांवर उपोषण करण्याची वेळ येणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. (BJP leader Girish Mahajan meets anna hazare in ralegansiddhi today)
ड्राफ्टवर विचार करणार
दरम्यान, केंद्र सरकारने दिलेल्या या ड्राफ्टवर अण्णांकडील तज्ज्ञांची टीम विचार करणार आहे. तसेच या ड्राफ्टमधील उणीवा दूर करून हा ड्राफ्ट पुन्हा केंद्राला पाठवण्यात येणरा आहे. त्यात समाधानकारक उत्तर मिळालं तर उपोषणावर पुनर्विचार करण्यात येणार आहे. मात्र, उत्तर समाधानकारक नसेल तर 30 जानेवारी उपोषण करणारच असल्याचं अण्णांनी स्पष्ट केलं आहे. (BJP leader Girish Mahajan meets anna hazare in ralegansiddhi today)
Video | Girish Mahajan | कृषी माल भाव ठरवणारी उच्चाधिकार समिती स्थापन करणार : गिरीश महाजन@girishdmahajan #AnnaHazare #Ahmednagar pic.twitter.com/m38BuQ4Tx1
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 28, 2021
संबंधित बातम्या:
गिरीश महाजन दुसऱ्यांदा अण्णा हजारे यांच्या भेटीला, भाजप नेत्यांकडून मनधरणी सुरु
फडणवीस, विखे-पाटलांकडून अण्णा हजारेंच्या मनधरणीचे प्रयत्न, मात्र अण्णा उपोषणावर ठाम
भाजपला अण्णांची भीती?, बागडे राळेगणसिद्धीत; दीड तास खलबतं
(BJP leader Girish Mahajan meets anna hazare in ralegansiddhi today)