PCMC Election | पिंपरीत भाजपला लागलेली गळती थांबेना ; भाजपच्या नगरसेविका माया बारणे यांनी दिला राजीनामा

| Updated on: Mar 04, 2022 | 4:08 PM

तापर्यंत भाजपच्या चार नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. यापूर्वी भाजप चे नगरसेवक वसंत बोराटे, चंदा लोखंडे आणि तुषार कामठे यांनी या पूर्वी राजीनामा दिला होता भाजपामधील भ्रष्टाचाराला कंटाळून राजीनामा दिल्याचे माया बारणे यांनी स्पष्ट केल आहे. नगरसेविका माया बारणे यांचे पती माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे ह्यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता.

PCMC Election | पिंपरीत भाजपला लागलेली गळती थांबेना ; भाजपच्या नगरसेविका माया बारणे यांनी  दिला राजीनामा
Maya Barne
Follow us on

पिंपरी- आगामी महानगरपालिका निवडणुकीचे वेध सर्वांचा लागेल आहेत. याना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्य निवडणूक आयोगाकडे (State Election Commission)नव्याने तयार करण्यात आलेली मतदार यादीही नुकतीच जमा करण्यात आली आहे. यास सगळ्या काळात महापालिका निवडणुकीच्या पूर्वी भाजपमध्ये सुरू झालेली गळती सुरूच आहे. पिंपरी चिंचवडमधील थेरगाव भागाच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या भाजपच्या(BJP) नगरसेविका माया बारणे ( BJP corporator Maya Barne)यांनी आज पक्षाचा राजीनामा दिला आहे. आतापर्यंत भाजपच्या चार नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. यापूर्वी भाजप चे नगरसेवक वसंत बोराटे, चंदा लोखंडे आणि तुषार कामठे यांनी या पूर्वी राजीनामा दिला होता भाजपामधील भ्रष्टाचाराला कंटाळून राजीनामा दिल्याचे माया बारणे यांनी स्पष्ट केल आहे. नगरसेविका माया बारणे यांचे पती माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे ह्यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता.  त्यामुळे माया बारणे ह्यादेखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता राजकीय या वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

गळतीचे मुख्य कारण

आगामी काळात होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये प्रभाग रचनेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. यामुळे अनेक नगरसेवकांचे दाब दणाणले आहेत. त्यातच ओबीसी आरक्षाणाचा निर्णय या सगळ्यामुळे अनेक नेत्यांच्या मनामध्ये अस्वस्थता आहे. आपले राजकीय करिअर धोक्यता येऊ नये. नव्या तयार झालेली प्रभाग रचना. आपला मतदार संघ बांधून ठेवण्यासाठी तसेच मजबूत करण्याच्या दृष्टी कोनातून ही पावले उचलली जात आहेत का? हे येत्या काळात स्पष्ट होईलच.

असे युद्ध ज्यात 5 कोटींपेक्षा जास्त लोक मारले गेले, जाणून थक्क व्हाल युद्धामागील रक्तरंजित कहाणी

Fraud : करोडोंची फसवणूक करणाऱ्या बंटी बबलीला अटक, गुंतवणुकीच्या नावाखाली सोन्याचे दागिने लंपास

प्रत्येक पत्नीने आपल्या पतीचे म्हणणे ऐकायला हवे..? ,जाणून घेऊया भारतीयांचे विचार !