पिंपरी चिंचवड : पुण्यात पिंपरी चिंचवड येथे 10 वर्षाच्या मुलांकडून घरातील लॅपटॉप बंद पडला. त्यामुळे मुलाने पालकांच्या भीतीने थेट घर सोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला. हा प्रकार वनदेव कॉलनी, थेरगाव येथे घडला. याबाबत वाकड पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर अवघ्या 3 तासात मुलाचा शोध घेतला. त्याला सुखरूपपणे पालकांच्या ताब्यात देण्यात आले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी मुलाचा शोध लावला.
विष्णू कास्टे यांच्या 10 वर्षीय मुलाकडून घरातील लॅपटॉप बंद पडला. त्यामुळे मुलाने भीतीपोटी कोणाला काहीही न सांगता घर सोडले होते. रात्री 9 वाजता मुलाने घर सोडले. विष्णू आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मुलाचा सर्वत्र शोध घेतला. मात्र मुलगा मिळून आला नाही. त्यामुळे कास्टे यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन वाकड पोलिसांना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले.
VIDEO: पुण्यात 10 वर्षाच्या मुलाकडून घरातला लॅपटॉप बंद पडला, पालकांच्या भितीने थेट घर सोडलं, पिंपरी चिंचवड पोलिसांनी अवघ्या 3 तासात शोध घेतला, वडिलांना अश्रु अनावर@PCcityPolice #PimpriChinchwad #Pune #Police pic.twitter.com/PkskzZXozY
— Pravin Sindhu | प्रविण सिंधू ??✊ (@PravinSindhu) August 4, 2021
तपासात पोलिसांनी विष्णू कास्टे यांच्या घराच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये त्यांचा मुलगा जवळच्या जिम जवळील बोळीमध्ये गेल्याचं दिसलं. यानंतर शोध घेतला असता मुलगा या बोळीत बसलेला असल्याचे आढळून आले. वाकड पोलिसांनी प्रसंगावधान राखत अवघ्या तीन तासाच्या आत मुलाला शोधून त्याच्या वडिलांच्या ताब्यात दिले. यावेळी मुलाचे वडील भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
Boy of 10 year old leave home in fear of parent after laptop damage in Pimpri Chinchwad