पुणे – सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीसाठी परवानगी मिळाल्यानंतर जिल्ह्यात उद्या ( 1जानेवारीला ) आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे पहिली बैलगाडा शर्यत पार पडत आहेत. या शर्यतकडे सर्व बैलगाडा प्रेमींचे लक्ष लागले आहे. आंबेगावमधील शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी बैलगाडा शर्यत आयोजित केली आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आवश्यक त्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या नियमाच्या सर्व नियमांचे पालन करून ही शर्यत पार पाडली जाणार आहे. याबरोबरच लसीकरणाचे दोन डोस पूर्ण झालेले बैलगाडा प्रेमींना या शर्यतीत सहभागी होता येणार आहे.
701 बैलगाडा मालक सहभागी
2017 नंतर प्रथम होत असलेल्या या बैलगाडा शर्यतीमध्ये तब्बल 701 बैलगाडा मालक सहभागी होत आहेत. जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विविध भागातून बैलगाडा मालक सहभागी होणार आहेत.
आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे होणाऱ्या बैलगाडा शर्यतीतील बक्षीस खालील प्रमाणे
-विशेष आकर्षण फायनल-मोटरसायकल
द्वितीय क्रमांक-सोन्याची अंगठी
तृतीय क्रमांक-सोन्याची अंगठी
चतुर्थ क्रमांक-सोन्याची अंगठी
New Zealand | विद्युत रोषणाई आणि फटाक्यांच्या आतषबाजीनं न्यूझीलंडमध्ये नववर्षाचं स्वागत
ITR फाईल करण्यासाठी उरले अवघे काही तास; मुदतवाढ मिळणार नाही, अर्थ मंत्रालयाकडून स्पष्ट