पुणे : Pune : राज्यातील बैलगाडी शर्यत (bullock cart race)ग्रामीण भागाचे वैशिष्ट असते. पुणे जिल्ह्यातील खेडीमधील लक्ष्या बैलांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत शर्यतीत बैलाने केलेला धिंगना दिसून येतोय. त्या बैलास आवारताना काही जण जखमी झाले आहे. बैलगाडा शर्यतीतील अशा प्रकारांमुळे शर्यतीला बंदी घातली गेली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ही बंदी उठवण्यात आली.
पुणे जिल्ह्यात झालेल्या बैलगाड्या शर्यतीत लक्ष्या बैलाने कसा धिंगाणा घातला, पाहा#PUNE #BullocktRace #PuneNews pic.twitter.com/QCZIx4QTFt
हे सुद्धा वाचा— TV9 Marathi (@TV9Marathi) January 12, 2023
अशी सुरु झाली पुन्हा बैलगाडा शर्यत :
केंद्र सरकारच्या आदेशानंतर ११ जुलै २०११ रोजी आदेशानुसार बैलगाडा शर्यतीवर (bullock cart race) बंदी आणली होती.त्यानंतर 20 एप्रिल 2012 रोजी राज्यात बैलगाडी शर्यतीवर बंदी घालण्यात आल्याचे जाहीर केले होते. सरकारच्या या निर्णयास विरोध होत होता. पुणे जिल्ह्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधींकडून देखील या बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याबाबत भूमिका मांडली.अखेर सर्वोच्च न्यायालयाने 16 डिसेंबर 2021 रोजी अटी व शर्थींसह बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवली.यानंतर राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले जात आहे.