पुणे – लष्कर भरतीतील घोटाळा उघड झाल्यानंतर आता राज्य राखीव पोलीस दलाच्या भरतीसाठी घेतलेल्या लेखी परीक्षेत डमी उमेदवाराला( dummy candidates) बसवून परीक्षा उत्तीर्ण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी उमेदवाराला फरासखाना पोलिसांनी (faraskhana police) अटक केली आहे. विक्रम सुरेश सोनवणे (रा. औरंगाबाद) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याने बसविलेल्या उमी उमेदवारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नेमक प्रकरण काय
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य राखीव पोलीस दलाची परीक्षा 12 डिसेंबर 2021 रोजी पार पडली. ही परीक्षा सबा पेठेतील आर सी एम गुजराथी कॉलेज येथे घेण्यात आली. या परिक्षेसाठी सशस्त्र पोलीस भरती प्रक्रिया2019 चा विक्रम सोनवणे हा उमेदवार होता. मात्र विक्रम सोनावणे याने आपल्या जागी लेखी परीक्षेच्या दरम्यान डमी उमेदवार बसवला. तो या परीक्षेत पासही झाला. सर्व कागदपत्रांची तपासणी केली असता त्यात सोनवणे याने डमी उमेदवार बसवून लेखी परीक्षा दिल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर भोंगळे यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. हा प्रकार फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असल्याने तो फरासखाना पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत.
लष्करात भरतीच्या निमित्तानेही फसवणूक
मागील काही दिवसांपूर्वी ही पिंपरी चिंचवड पोलिसांनी लष्करात भरती करण्याचा नावाखाली फसकवणूक करणाऱ्या तीन जणांच्या मुसक्या आवळल्या होत्या. यामध्ये लष्करातील निवृत्त कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचे समोर आले होते. भरती दरम्यान ही बाब लक्षात आल्यानंतर लष्करातील अधिकाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली होती. त्यानंतर तिघांना अटक करण्यात आली होती.
सर्वाधिक मायलेज देणाऱ्या टॉप 5 बाईक, किंमत 60 हजारांहून कमी
weather forecast | विदर्भात ऊन-पावसाचा खेळ सुरूच; येत्या दोन दिवसांत काय सांगतो हवामानाचा अंदाज?
corona | कोरोनाशी दोन हात करण्यासाठी रामबाण उपाय ‘काढा’, जाणून घ्या काढा घेण्याचे फायदे