पुणे महामार्गावर पुन्हा अपघात, तिघांनी गमवले प्राण

| Updated on: Feb 24, 2023 | 11:53 AM

अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला असून, जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुणे महामार्गावर पुन्हा अपघात, तिघांनी गमवले प्राण
सोलापुरात कंटेनर आणि बाईक अपघातात एक ठार
Image Credit source: socialmedia
Follow us on

पुणे : पुणे परिसरात अपघातांचे सत्र गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. आता पुणे (Pune) सोलापूर महामार्गावर अपघात झाला आहे. भिगवान परिसरात झालेल्या या अपघातात भरधाव वेगाने जाणारी कार (Car Accident) पलटली. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला. कार चालकाने वाहनावरील नियंत्रण गमवल्यामुळे कार उलटली. या अपघातात एक जण जखमी झाला आहे. मृतांमध्ये संदीप राजाभाऊ माळी (35), बालाजी करबा तिडके (48) आणि सरस्वती राजाभाऊ माळी (61) यांचा समावेश आहे. तिघे जण लातूर जिल्ह्यातील आहेत.

कसा झाला अपघात

हे सुद्धा वाचा

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर तालुक्याच्या हद्दीजवळ शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने पुण्याकडे जाणारी कार भिगवण बस स्थानकाजवळ उतारावर कार उलटली.

या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला असून, जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चंद्रकांत रामकिशन गवळी असे जखमी व्यक्तीचे नाव असून तो ही लातूरचा राहणारा आहे.

मागील आठवड्यात पाच महिलांचा मृत्यू


महामार्गावरील राजगुरुनगरजवळ असणाऱ्या शिरोली परिसरात १४ फेब्रवारी रोजी अपघात झाला होता. या घटनेत भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या महिलांच्या घोळक्याला जोरदार धडक दिली. या अपघातात पाच महिलांचा मृत्यू झाला होता, तर 17 महिला जखमी झाल्या होत्या.

पुणे शहरातून खेड तालुक्यातील शिरोली येथील मंगल कार्यालयात स्वयंपाकासाठी या महिला गेल्या होत्या. काम संपवून त्या महिला घरी जात होत्या. परंतु घरी पोहचण्यापुर्वीच काही महिलांना काळाने गाठले. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस चालकाचा शोध घेत आहेत.

महिन्याच्या सुरुवातीला अपघात

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर (Pune Solapur Expressway) १ फेब्रवारी रोजी भीषण अपघात (Accident)झाला. बस आणि ट्रकच्या झालेल्या या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला. तसेच २० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. मृत झालेले चौघे जण बसमधील प्रवाशी होते. पोलीस कर्मचारी नितीन दिलीप शिंदे (वय ३६) अमर मानतेश कलशेट्टी (वय २०), गणपत मलप्पा पाटील (वय ५५), आरती बिराजदार (वय २५) अशी मृत्यू पावलेल्यांची नावे आहेत. सोलापूरहून पुण्याकडे ही लक्झरी बस निघली होती. या बसचे टायर फुटल्याने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कंटेनरवर बस आदळली. या अपघातात बसची एक बाजू चक्काचूर झाली.