पुणे : पुणे येथील बांधकाम व्यावसायिक सीबीआयच्या रडारवर आले आहेत. सीबीआयने बांधकाम व्यावसायिकावर कारवाई केली आहे. युनियन बँक ऑफ इंडियाची ९१ कोटी रुपयांमध्ये फसवणूक केल्या प्रकरणात ही कारवाई झाली आहे. के. जे. इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स इंडिया प्राव्हेवेट लिमिटेड या कंपनीवर आणि तिच्या संचालकांवर कारवाई झाली आहे. या कारवाईमुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. दोन दिवसांत दोन जणांवर केंद्रीय तपास संस्थांकडून कारवाई झाली आहे.
युनियन बँक ऑफ इंडियाने सीबीआयकडे फसवणुकीची तक्रार दाखल केली. त्यानंतर सीबीआयने कारवाई सुरु केली. के.जे. इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स इंडिया प्राइव्हेट लिमिटेडने त्यांच्या स्टॉक बुक, कर्ज विवरणाची खोटी आकडेवारी सादर केली. तसेच नफा अन् तोटासंदर्भात चुकीची आकडेवारी दिली. या सर्व माहितीच्या आधारे या कंपनीने क्रेडिट सुविधांचा लाभ घेत ९१ कोटीत फसवणूक केली.
युनियन बँक ऑफ इंडियाने के.जे. इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स इंडिया प्राइव्हेट लिमिटेड या कंपनीच्या विरोधात तक्रार दिली. त्यानंतर सीबीआईने कारवाई सुरु केली. कंपनीचे संचालक कल्याण जाधव, कल्याण एकनाथ काकडे, संतोष संभाजी धूमल आणि अमोल मारुती पेगुडे, तसेच कंपनीची आणखी एक शाखा विंग इंफ्रास्ट्रक्चर इंजीनियरिंग प्राव्हवेट लिमिटेड आणि विनोद कल्याण जाधव यांची नावे आहेत.
सीबीआयने आरोप लावला की, आरोपींनी हा पैसे सरळ खात्यात हस्तांतरीत केला. त्यामुळे बँकेचे 91.92 कोटी रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणात सीबीआयने पुणे आणि जवळपासच्या ठिकाणी छापेमारी केली. त्यात हार्ड डिस्क, इलेक्ट्रॉनिक गॅजेट जप्त केले आहे. या प्रकरामुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ निर्माण झाले आहे.
अंमलबजावणी संचालयाने पुणे येथील सेवा विकास बँकेचे (seva vikas bank) माजी अध्यक्ष असलेल्या अमर मूलचंदानी यांना अटक केली. त्यानंतर दुसऱ्या केंद्रीय संस्थेच्या रडारवर पुणे येथील बिल्डर आले आहे. यामुळे सामान्यांची किंवा बँकांची फसवणूक करणारे तपास संस्थांच्या रडारवर आले आहेत.