आता तो पूल काय देवेंद्रजींच्या काळात बांधणार हे त्यांना माहिती – चंद्रकांत पाटील

| Updated on: Jan 01, 2021 | 4:48 PM

आता भविष्यात तो पूल ते त्यांच्या काळात बांधतात की देवेंद्रजींची काळात बांधणार हे त्यांना माहिती आहे अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सूचक विधान केलं आहे.

आता तो पूल काय देवेंद्रजींच्या काळात बांधणार हे त्यांना माहिती - चंद्रकांत पाटील
Follow us on

पुणे : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. अशात आता भाजपच्या बड्या नेत्या महाविकास आघाडी सरकार लवकर पडणार असल्याचं सूचक वक्तव्य केलं आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकातील पूल महाविकास आघाडीच्या काळात पाडण्यात आला. आता भविष्यात तो पूल ते त्यांच्या काळात बांधतात की देवेंद्रजींची काळात बांधणार हे त्यांना माहिती आहे अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सूचक विधान केलं आहे. ते पुण्यात आयोजित पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलत होते. (chandrakant patil criticized on maha vikas aghadi government in pune)

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटलांनी अनेक मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. सध्या औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करण्यावरून सत्ताधारी आणि विरोधक असा वाद पेटल्याचं पाहायला मिळत. यावरूनही चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेवर टीका केली आहे. औंरगाबादचं नाव बदलणं हा भाजपचा राजकीय मुद्दा नसून श्रद्धेचा विषय आहे. अजुनही औरंगजेबावर प्रेम आहे का? असा सवाल उपस्थित करत आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम असल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.

ते पुढे म्हणाले की, औरंगाबाद शहरांचं नाव बदलावं ही मागणी बाळासाहेबांच्या काळापासून आहे. ज्यावेळी ते गोदड्या भीजवत होते तेव्हापासूनची ही मागणी आहे. त्यामुळे आमची भूमिका हीच असणार आहे असा ठाम विश्वास यावेळी चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, यावेळी त्यांनी शिवसेना आणि सामना अग्रलेखावरही टीका केली आहे.

‘मी रश्मी वहिनींना पत्र लिहणार’

सामना अग्रलेखाची भाषा अतिशय खालच्या पातळीची आहे. रश्मी वहिणी या सामनाच्या संपादक असताना ही भाषा चांगली नाही. त्यामुळे यासंबंधी मी त्यांना पत्र लिहणार असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. ’सामना’मध्ये माझ्याविरोधात गलिच्छ भाषेत लिखाण केलं. त्यामुळे ‘सामना’च्या संपादक रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांना पत्र लिहिणार आहे, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी संताप व्यक्त केला. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Sanjay Raut) यांना आलेल्या ईडी नोटिसीविषयी लिहिताना अग्रलेखात आपल्याविषयी वापरलेली भाषा अशोभनीय असल्याची तक्रार चंद्रकांतदादांनी केली आहे.

चंद्रकांत पाटलांचा नवीन वर्षाचा संकल्प काय?

कोरोनाच्या काळात प्रवासावर मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे कुठेही जाणं शक्य नव्हतं. पण आता सगळ्यांशी संवाद साधणार आहे. तर आगामी निवडणुकांमध्ये यश मिळवणं हे महत्त्वाचं लक्ष असणार आहे. मुंबईकरांच्या नागरी समस्या बाजुला ठेवून हे अनैसर्गिक सरकार काम करत आहे. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये सगळ्या महापालिकांमध्ये भाजपचं यश दिसेल असा विश्वास चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला आहे. (chandrakant patil criticized on maha vikas aghadi government in pune)

संबंधित बातम्या – 

बाळासाहेबांचा शब्द महत्त्वाचा की सत्तेची लाचारी; राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

माझ्याविरुद्ध गलिच्छ भाषेत लिखाण, चंद्रकांतदादा थेट रश्मी ठाकरेंना पत्र लिहिणार

(chandrakant patil criticized on maha vikas aghadi government in pune)