Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा, पुणे शहरातील कोणते रस्ते राहणार बंद पाहा

| Updated on: Jul 29, 2023 | 9:14 AM

Pune News : पुणे शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आहे. यामुळे शहरातील वाहतूक मार्गात बदल केला गेला आहे. तसेच शहरात सुरु असणारी रस्त्यांची काही कामेही थांबवण्यात आली आहे.

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा, पुणे शहरातील कोणते रस्ते राहणार बंद पाहा
Pune
Follow us on

योगेश बोरसे, पुणे | 29 जुलै 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्ट रोजी पुणे शहरात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याची जिल्हा प्रशानाकडून तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी स.पा. महाविद्यालय आणि पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर मोठा मंडप टाकला जात आहे. सुरक्षेच्या कारणास्तव तीन दिवस महाविद्यालयात चौकशी करूनच लोकांना सोडण्यात येणार आहे. या महाविद्यालयाच्या मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दिला जाणार आहे. त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर शासकीय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामुळे पुणे शहरातील वाहतुकीत काही बदल केले आहे.

काय असणार बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्ट रोजी येणार असल्यामुळे पीएमपीच्या काही मार्गामध्ये बदल केला जाणार आहे.
१ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा आणि आण्णाभाऊ साठे यांची जयंती असल्यामुळे पीएमपी प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. ३५४ या मार्गांच्या बस जेधे चौक, सारसबाग या ठिकाणी जाणार आहे. त्याऐवजी ही वाहतूक लक्ष्मी नारायण टॉकीजकडून सारसबाग मार्गे होणार आहे. तसेच स्वारगेट येथील नटराज बस स्थानकाचा रस्ता बंद होणार असल्यामुळे बस स्थानकावरून सुटणाऱ्या बसेस खंडोबा मंदिर, पर्वती पायथा येथून सुटणार आहेत.

सिंहगड रस्ताचे काम थांबवले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा असल्याने सिंहगड रस्त्यावर सुरु करण्यात येणारी कामे थांबवण्यात आली आहेत. या रस्त्यावर नो पार्कींग नो हॉल्टिंगचे काम सुरु केले जाणार होते. आता हे काम पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यानंतर करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

मोहरमनिमित्त वाहतूक बंद

मोहरमनिमित्त शहरातील वाहतुकीत आज दुपारनंतर बदल केला आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. मोहरममुळे शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका निघतात. यामुळे वाहतूक कोंडी होते असल्याने पर्यायी मार्ग वापरावे, असे वाहतूक पोलिसांनी आवाहन केले आहे.