Marathi News Maharashtra Pune Chatrapati Sambhajiraje will fight Rajyasabha election independently and he has also formed new organization named as swarajya
अपक्ष लढण्यापासून स्वराज्य संघटनेच्या स्थापनेपर्यंत! छत्रपती संंभाजीराजेंनी सांगितलेले TOP 9 मुद्दे
पुढील निवडणुकीला अपक्ष सामोरं जाणार असल्याचं संभाजीराजे यांनी स्पष्ट केलंय. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजकीय फायद्यासाठी नव्हे, तर लोकहितासाठी आपण हा निर्णय घेतला असल्याचं संभाजीराजे यांनी म्हटलंय. यासोबत त्यांनी स्वराज्य नावाच्या संघटनेची स्थापना करणार असल्याचंही जाहीर केलंय.
Image Credit source: tv9 marathi
Follow us on
पुणे : खासदारकीची टर्म संपल्यानंतर आता संभाजीराजे (Sambhaji Raje) यांची राजकीय वाटचाल काय असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर छत्रपती संभाजीराजे यांनी महत्त्वाची आणि मोठी घोषणा केली. राज्यसभेची (Rajya Sabha) निवडणूक लढण्याचा निर्णय संभाजीराजे यांनी यावेळी जाहीर केला. त्यासोबत या निवडणुकीला अपक्ष सामोरं जाणार असल्याचं संभाजीराजे यांनी स्पष्ट केलंय. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजकीय फायद्यासाठी नव्हे, तर लोकहितासाठी आपण हा निर्णय घेतला असल्याचं संभाजीराजे यांनी म्हटलंय. यासोबत त्यांनी स्वराज्य (Swarajya) नावाच्या संघटनेची स्थापना करणार असल्याचंही जाहीर केलंय. या संघटनेच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराजांसोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणार असल्यांचं म्हटलंय. संभाजी राजे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितलेले 9 महत्त्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे-
राष्ट्रपती नियुक्त खासदार संभाजी राजेंची खासदारकीचा कार्यकाळ संपतोय. त्यानंतर त्यांची राजकीय वाटचाल काय असणार हे स्पष्ट झालं आहे.
जुलैमध्ये राज्यसभेच्या सहा जागा खाली होणार आहेत. त्यापैकी एका जागेवर छत्रपती संभाजीराजे हे अपक्ष निवडणूक लढणार आहेत.
याआधी राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून संधी दिल्याबद्दल संभाजीराजे यांनी राष्ट्रपतींसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवासांचेही आभार मानले.
अपक्ष निवडणूक लढवण्यासोबत यावेळी राजकीय संघटनेचे सूतोवाच संभाजीराजेंनी दिले. स्वराज्य नावाच्या संघटनेची स्थापना करत असल्याची घोषणा यावेळी संभाजीराजे यांनी केली.
स्वराज्य संघटना येत्या काळात राजकारणातही सक्रिय होऊ शकते, असेही संकेत छत्रपती संभाजीराजे यांनी दिले आहेत.
महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर राजकीय समीकरणं बदलली आहेत.अपक्ष लढवण्याचा निर्णय का घेतला, याचंही उत्तर छत्रपती संभाजीराजे यांनी दिलं. छत्रपतींच्या नावानं आणि शाहू, फुले, आंबेडकरांच्या नावानं जे राजकीय पक्षा चर्चा करतात त्यांची भूमिका छत्रपतींच्या घराण्यातील वंशजाबद्दल कशी असते, हे आता कळेल, असं संभाजीराजे यांनी म्हटलंय.
भलेही भाजपकडून प्रेरीत असल्याचा ठपका छत्रपती संभाजीराजे यांच्यावर लावला जात असला तरिही योग्य वाटल्यानंतर मी महाविकास आघाडीची बाजू घेतल्याचं विधान संभाजीराजे यांनी केलंय.
राजकीय फायद्यासाठी नव्हे, तर लोकहितासाठी आपण स्वराज्य संघटनेच्या स्थापनेचा आणि अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असल्याचं संभाजीराजे यांनी म्हटलंय.
छत्रपती संभाजीराजे यांनी घेतलेल्या निर्णयानंतर आता राज्यसभा निवडणुकीच्या समीकरणातही चुरस पाहायला मिळणार आहे.