अमित शाह शब्दाला जागले, माझ्यापाठी पहाडासारखे उभे राहिले; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान

| Updated on: Feb 19, 2023 | 9:45 AM

योगायोग म्हणजे निवडणूक आयोगाचा निकाल आल्यानंतर भाजपचे नेते अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. शाह यांचा दौरा पूर्वनियोजित आहे. काल शाह यांनी कार्यकर्त्यांशी संबोधित करताना उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला.

अमित शाह शब्दाला जागले, माझ्यापाठी पहाडासारखे उभे राहिले; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान
eknath shinde
Image Credit source: ani
Follow us on

पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिलं आहे. त्यामुळे शिंदे गटामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. गेल्या आठ महिन्यापासून शिंदे गट आणि ठाकरे गटात पक्ष आणि निवडणूक चिन्हावरून वाद सुरू झाला होता. हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेलं. त्यानंतर आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या सर्व संघर्षाच्या काळात शिंदे गटाला भाजपची साथ मिळाली त्यामुळे शिंदे गटाकडून आता भाजपचे आभार मानले जात आहेत. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत.

TV9 Marathi Live | Shivsena Name & Symbol | Thackeray vs Shinde | Eknath Shinde | Uddhav Thackeray

अमित शाह मला म्हणाले होते, शिंदेजी तुम्ही पुढे व्हा. आम्ही तुमच्यापाठी पहाडासारखे उभे राहू. आणि ते शब्दाला जागले. जे सांगितलं तेच त्यांनी केलं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी काल हे विधान केलं.

हे सुद्धा वाचा

गेल्या वर्षी जून महिन्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं होतं. त्यांनी 50 आमदार घेऊन शिवसेनेत बंड केलं. त्यामुळे शिवसेना पक्ष फुटला. उद्धव ठाकरे यांना सत्तेतून बाहेर जावं लागलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी करून सत्ता स्थापन केली. ते स्वत: मुख्यमंत्रीही बनले. विशेष म्हणजे या काळात 13 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आणि एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं पारडं जड झालं.

ठाकरेंना धक्का

त्यानंतर दोन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने निर्णय दिला. शिवसेना पक्ष कुणाचा आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाचं? यावर निवडणूक आयोगात वाद सुरू होता. त्यावर आयोगाने निर्णय देत पक्षाचं नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिलं. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

दूध का दूध पानी का पानी

योगायोग म्हणजे निवडणूक आयोगाचा निकाल आल्यानंतर भाजपचे नेते अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. शाह यांचा दौरा पूर्वनियोजित आहे. काल शाह यांनी कार्यकर्त्यांशी संबोधित करताना उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला. निवडणूक आयोगाने दूध का दूध, पानी का पानी केलं आहे.

महाराष्ट्रात सत्यमेव जयतेचा फॉर्म्युला स्थापन झाला आहे. मोदींचा फोटो लावून मते मागितली. मात्र, निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपायी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे तळवे चाटले, अशी टीका अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता केली.

अडीच वर्ष वाया गेले

तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात डबल हॉर्सपॉवरवाली सरकार असल्याचं म्हटलं. महाविकास आघाडीचे राज्यातील अडीच वर्ष वाया गेले. आपल्याकडे अजून अडीच वर्ष बाकी आहेत. त्यामुळे आपल्याला खूप काम करावे लागमार आहे. आमचं डबल इंजिनचं सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जोरदार काम करेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.