पुणे शहराला रात्री हुडहुडी, 3 वर्षातलं सर्वात कमी तापमान, पारा…

| Updated on: Feb 16, 2023 | 1:03 PM

मागील वर्षी फेब्रवारी महिन्यात पुणे शहराचे तापमान 9.9 अश सेल्लियसवर आले आहेत. 2021 मध्ये 8.6 अंश सेल्सियस होते. तर 2020 मध्ये 10.1 अंश सेल्सियस तापमान आले होते.

पुणे शहराला रात्री हुडहुडी, 3 वर्षातलं सर्वात कमी तापमान, पारा…
पुणे तापमानात घसरण
Follow us on

पुणे : थंडीचा कडाका राज्यातील काही भागांत चांगलाच जाणवू लागला आहे. पुणे शहरात चार-पाच दिवसांपासून चांगलाच गारठा (coldest Pune) जाणवत आहे. त्यात पहाटे अन् रात्री थंडी, तर दिवसा अंगाची लाही लाही करणारे ऊन जाणवत होते. परंतु आता त्यात बदल झाला आहे. बुधवारी गेल्या तीन वर्षातील सर्वात नीचांकी तापमानाची (temperature) नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात गेल्या तीन वर्षात प्रथमच तापमान 8.4 अंश सेल्सिअसवर आलंय. दुसरीकडे मुंबईतील तापमानात मात्र वाढ झाली आहे. मुंबईकरांना फेब्रुवारी महिन्यातच एप्रिलचा कडाका जाणवत आहे.

मागील वर्षी फेब्रवारी महिन्यात पुणे शहराचे तापमान 9.9 अश सेल्सिअसवर आले आहेत. 2021 मध्ये 8.6 अंश सेल्सिअस होते. तर 2020 मध्ये 10.1 अंश सेल्सिअस तापमान आले होते. आता शुक्रवारपासून पुणे शहरातील तापमान वाढण्यास सुरुवात होणार असल्याचे पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजात म्हटलंय. आठवड्याअखेर तापमान 12 ते 13 अंश सेल्सिअसपर्यंत जाणार आहे.

कमाल तापमान कमी

हे सुद्धा वाचा


जशी उन्हाळ्याची चाहूल लागल्यामुळे आर्द्रता आणि तापमानात स्पर्धा सुरू होते. आर्द्रता वाढली की कमाल व किमान तापमान कमी होते. 15 फेब्रुवारी रोजी आर्द्रता वाढल्याने पुणे शहराच्या किमान तापमानात तब्बल 4 अंश सेल्सियसने घट झाली. पुणे शहराचे तापमान 12.5 अंशांवरून 8.4 अंशांवर खाली आले, तर कमाल तापमान 37.5 अंशांवरून 33.3 अंशांवर खाली आले.

का होतोय बदल


उत्तर भारतात तयार होणार्‍या पश्चिमी चक्रवातामुळे गार वारे येत आहेत. वातावरणात आर्द्रता वाढल्याने किमान तापमान 12 वरून 8 अंशांवर आले. मात्र, हे वातावरण 18 फेब्रुवारीपर्यंत राहील. त्यानंतर मात्र कमाल व किमान तापमानात वाढ होण्यास सुरुवात होणार आहे.

मुंबईत तापमानात वाढ

राज्यातील काही भागांत अजूनही थंडीचे वातावरण कायम आहे. त्याच्या उलट मुंबईचे तापमान वाढत चालले आहे. मुंबईत रात्रीचे तापमानही वाढले आहे. आता मुंबईचे तापमान 37.3 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहचले होते.  2019 नंतरचे हे फेब्रुवारी महिन्यातील दुसरे सर्वाधिक नोंदवलेले गेलेले तापमान आहे.

अलीकडच्या वर्षातील हे सर्वाधिक तापमान मानले जात आहे. दोन वर्षांपूर्वी 2021 सालातील फेब्रुवारी महिन्यातील कमाल तापमान 36.3 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहचले होते. गेली तीन दिवस तापमान 35 डिग्री सेल्सिअसच्या वरच आहे. गेल्यावर्षी फेब्रुवारीतील उच्चांकी तापमान 12 फेब्रुवारी रोजी 34.8 डिग्री नोंदले गेले होते. अरबी समुद्रातील बदलल्या परिस्थितीमुळे एण्टी सायक्लोनिक सर्कुलेशन सिस्टीम तयार झाली आहे. त्याच्या प्रभावामुळे वातावरणातील हा बदल होत आहे.