काँग्रेसला उमेदवार जाहीर होण्यापुर्वीच धक्का, मोठा नेता भाजपच्या वाटेवर

| Updated on: Feb 06, 2023 | 8:02 AM

रशीद शेख २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये दाखल झालेल होते. रविवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चर्चा करून त्यांची समजूत काढली.

काँग्रेसला उमेदवार जाहीर होण्यापुर्वीच धक्का, मोठा नेता भाजपच्या वाटेवर
congress
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणे : काँग्रेसने कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अद्याप जाहीर केली नाही. कसबा पेठेत काँग्रेसमध्ये रवींद्र धंगेकर यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात येत होते. त्यांच्या कार्यालयासमोर शनिवारी फटाकेही फोडण्यात आले. परंतु काँग्रेसमध्ये धंगेकर यांच्या उमेदवारीवरुन नाराजी आहे. त्यास काही स्थानिक नेत्यांची फूस आहे.काँग्रेसच्या बाळासाहेब दाभेकर यांनी निष्ठावंतांना डावलून बाहेरच्या उमेदवारांना तिकीट दिल्यास बंडखोरी करणार असल्याचे आव्हान दिले आहे. यामुळे काँग्रेसचा उमेदवार जाहीर होऊ शकला नाही.आता अजून एक संकट काँग्रेससमोर आले आहे.

माजी मंत्रीपुत्र भाजपच्या वाटेवर

काँग्रेसचे माजी मंत्री रमेश बागवे यांचे पुत्र माजी नगरसेवक अविनाश बागवे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. अविनाश बागवे पक्षावर नाराज आहेत. काँग्रेसचे माजी नगरसेवक रशीद शेख यांना पक्षात पुन्हा प्रवेश दिल्यामुळे अविनाश बागवे नाराज आहेत.

हे सुद्धा वाचा

कोण आहेत रशीद शेख

रशीद शेख २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये दाखल झालेल होते. रविवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चर्चा करून त्यांची समजूत काढली. त्यानंतर शेख यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या वेळी त्यांना प्रदेशात पद देण्याचे आश्‍वासन पक्षाच्या वतीने देण्यात आले. शेख यांचा हा प्रवेश सोहळा अविनाश बागवे यांना नको होता. शेख यांना पक्षात प्रवेश देताना विश्वासातही घेतले नाही. यामुळे बागवे नाराज झाले आहे. ते आता भाजपच्या वाटेवर आहे.  यामुळे रविवारी अविनाश बागवे काँग्रेस कार्यालयात आले नाही.

भाजपमध्ये नाराजीनाट्य, लागले बॅनर

कसबा पेठ पोटनिवडणूक भाजपसाठी सोप नाही. भाजपमध्ये नाराजीनाट्य सुरु आहे.  मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी न देता हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्याने अनेक जण नाराज असल्याचे बोलले जात आहे.

आजारी असतानाही राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मुक्ता टिळक मतदानाला मुंबईत आल्या होत्या. रुग्णवाहिकेतून त्या आल्या होत्या. पक्षासाठी एवढी निष्ठा दाखवूनही त्यांच्या कुटुंबीयांना का डावलले गेले आहे? अशी चर्चाही कसब्यात दबक्या आवाजात होत आहे.

समाज कुठवर सहन करणार?

समाज कुठवर सहन करणार? असा सवालही या बॅनरवर करण्यात आला आहे. यातून ब्राह्मण समाज भाजपवर प्रचंड नाराज असल्याचा स्पष्ट इशाराच या बॅनर्सवरून देण्यात आला आहे. त्यामुळे ब्राह्मण समाजाच्या आणि टिळक समर्थकांच्या नाराजीचा फटका भाजपला बसणार असल्याची चर्चाही सुरू आहे.