पुणे- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचे( Local body elections) वारे सर्वत्र वाहत आहेत. शहारातील राजकीय वाढलेल्या दिसून येत आहेत . शहरातील आजी-माजी राजकीय पुढाऱ्याकडून नगरसेवक पदासाठी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. अनेक ईच्छुक उमेदवारही उमेदवारी मिळावी म्हणून मेहनत घेत आहेत. यासगळ्या गोष्टी करताना अनेकदा प्रसिद्धीसाठी न अनेक इच्छुकांकडून पुणे महानगर पालिकेचा (Pune Municipal Corporation)लोगो तसेच इमारतीचा फोटो वापरला जात आहे. पण या प्रकारे महानगर पालिकेचा लोगो वापरणे भावी नगरसेवकांना (corporators)महागात पडणार आहे. महापालिका सभागृहाची मुदत 14 मार्च रोजी संपुष्टात आल्यावर, 15 मार्चपासून महापालिकेत प्रशासकराज सुरू झाले. त्यावेळी सर्व विद्यमान नगरसेवक व पदाधिकारी माजी झाले आहेत.
पुणे महापालिकाही कोणीही प्रसिद्धीसाठी महापालिकेच्या लोगोचा वापर केला तर कारवाई करणार आहे. महापालिकेचे नाव, इमारतीचा फोटो व लोगोचा वापर कोणी वैयक्तिक प्रसिद्धीत केलाही कारवाई केली जाणार आहे. विधानसभा अध्यक्षांच्या परवानगीशिवाय विधानसभेचा लोगो अथवा फोटो कोणालाही वापरता येत नाही. तसेच एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इमारतीचा लोगो व फोटो कोणीही वापरू शकत नाही; मात्र निवडणुकीच्या काळात अनेक इच्छुकांकडून भावी नगरसेवक म्हणून फलकबाजीतून स्वत:ची प्रसिद्धी करताना, महापालिकेच्या इमारतीचा व लोगोचा सर्रास वापर करण्यात येत आहे.
मतदारांना खूश करताना आयोजित केलेल्या उद्घाटन, लोकार्पण, विविध शिबिरांमध्ये महापालिकेचा लोगो वापरलाजात आहे. महापालिकेच्या नावाचा वापर संबंधितांकडून सोशल मीडियावरही केला जात आहे. महापालिकेच्या लोगोचा व इमारतीचा फोटो असल्यामुळे अनेकांना हा महापालिकेशी संबंधितच कार्यक्रम आहे, असा भ्रम निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर महापालिकेने नुकतेच आदेश जारी करून असा वापर थांबविण्याचे सांगून, लोगो व फोटोचा वापर केल्यास संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. याचे अनुकरण आता पुणे महापालिकाही करणार असून, लवकरच तसे आदेश जारी होणार आहेत.