पुणे- शहरात कोरोनाची रुग्णसंख्या वाढतच आहे. एमआयटी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयानंतरआता स प महाविद्यालयातील दोन विद्यार्थांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे विद्यालय प्रशासनामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या सरुग्ण संख्येमुळे पुन्हा एकदा प्रॅक्टिकल असणारे अभ्यासक्रम वगळता इतर अभ्यासक्रम ऑनलाईन घ्यावेत असा विचार सुरु असल्याचे समोर आले आहे.
कोरोना नियमांचे पालन करून ऑफलाईन वर्ग सुरू
शहरात वेगाने वाढत असलेल्या रुग्ण संख्येमुळे कोरोनाचे निर्बध कडक करण्यात आले आहेत. रात्री 9 ते सकाळी 6 आहेत. लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच ऑफलाईन वर्गांमध्ये प्रवेश दिला जात आहे. तरी देखील विद्यार्थ्यां कोरोनाचा संसर्ग होत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. त्यामुळे राज्य शासनाने नवे निर्बंध लावले आहेत. राज्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यातील शैक्षणिक संस्थांनी कोरोना विषयक नियमांचे पालन करून ऑफलाईन वर्ग सुरू ठेवले आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच ऑफलाईन वर्गांमध्ये प्रवेश दिला जात आहे. मात्र, तरीही महाविद्यालयांमधील विद्यार्थी कोरोना बाधित होत असल्याचे दिसून येत आहे.
विज्ञान शाखेतील वर्ग ऑनलाईनच
महाविद्यालयातर्फे कोरोना विषयक सर्व नियमांचे पालन केले जात आहे.मात्र,काही दिवसांपूर्वी महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या दोन विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यामुळे महाविद्यालयाने या वर्गातील विद्यार्थ्यांना केवळ ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. या विद्यार्थ्यांचा ऑफलाईन वर्ग सध्या बंद आहे असे स.प.महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.सविता दातार यांनी सांगितले.”
शहरातीला कोरोनाची स्थिती
शहरात आज दिवसभरात 524 पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ झाली.
– दिवसभरात रुग्णांना 79 डिस्चार्ज.
– पुणे शहरात करोनाबाधीत 01 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 01 एकूण 02 मृत्यू.
– 99 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या511141 .
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2514 .
– एकूण मृत्यू -9118 .
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 499509 .
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 6786 .
मुंबई पाठोपाठ ठाण्यातही 500 चौ. फुटापर्यंत घरांना करमाफी मिळणार, नेमकी योजना काय? वाचा सविस्तर
Royal Enfield चा बाजारात धुमाकूळ, Hero MotoCorp ला पछाडलं, विक्रीत 7 टक्क्यांची वाढ
उद्यापासून मुलांच्या लसीकरणाला सुरुवात; मुंबई महापालिका सज्ज, 9 केंद्रांवर लसीकरणाची सोय