Video | जन्माला आले चक्क दोन तोंडाचे वासरु, नागरिकांनी केली एकच गर्दी

| Updated on: Sep 20, 2021 | 8:26 PM

पिंपरी चिंचवडमध्ये एका गाईने चक्क दोन तोंडाच्या गोंडस वासराला जन्म दिलाय. हे वासरु पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केलीय. खिल्लारी जातीच्या गाईने या दुर्मिळ वासराला जन्म दिलाय. सध्या या वासराची प्रकृती ठणठणीत आहे.

Video | जन्माला आले चक्क दोन तोंडाचे वासरु, नागरिकांनी केली एकच गर्दी
Follow us on

पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये एका गाईने चक्क दोन तोंडाच्या गोंडस वासराला जन्म दिलाय. हे वासरु पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलीय. खिल्लारी जातीच्या गाईने या दुर्मिळ वासराला जन्म दिलाय. सध्या या वासराची प्रकृती ठणठणीत आहे. (cow give birth to calf having two face for eyes in pimpri chinchwad pune)

वासराला पाहण्यासाठी लोकांची गर्दी

मिळालेल्या माहितीनुसार शहरातील पिंपरी गावामध्ये गणेश कापसे यांची पाळीव गाय प्रसूत झाली. प्रसूत झाल्यानंतर वासराला चक्क दोन डोके असल्याचे गायीच्या मालकाच्या लक्षात आले. ही घटना समजताच पिंपरी चिंचवड तसेच पुण्याच्या परिसरात ही बातमी वाऱ्यासरखी पसरली. गाईच्या या वासराला पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.

उभे राहण्यास वासराला अडचण 

परंतु या वासराला असलेली दोन तोंडे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला आहेत. त्यामुळे  आगावीच्या डोक्याचे वजन वासरु पेलू शकत नाहीये. तसेच दोन डोक्यांचे वजन जास्त झाल्यामुळे वासराला उभे राहण्यास अडचणी येत आहेत.

पाहा व्हिडीओ :

 

वासराला दोन तोंड, चार डोळे 

या वासराला चार डोळे आहेत. त्याचे चारही डोळे सोबतच बंद होतात तसेच उघडतात. दोन डोकी एकमेकांना जोडलेले असल्याने दोन्ही बाजूला दोनच कान आहेत. वासराचे दोन्ही तोंडे स्पष्टपणे दिसतात. शरीराच्या तुलनेत मान मोठी असल्याने वासराला उभे राहण्यास कशाचातरी आधार घ्यावा लागत आहे.

इतर बातम्या :

ठाण्यातील काही भागात येत्या बुधवारी पाणी पुरवठा बंद; ‘या’ भागात पाणी नाही

लाखो रुपयांचे दागिने चोरीचा उलगडा, पहाटे मॉर्निंग वॉकल्या जाणाऱ्या वृद्धांना लक्ष्य करणारे चोरटे जेरबंद, पोलिसांची लाजवाब कामगिरी

राज्यसभेचा उमेदवार जाहीर करुन भाजपनं प्रथा मोडली?, थोरातांनी महाजनांची आठवण करून दिली, काँग्रेस भाजपला विनंती करणार?

(cow give birth to calf having two face for eyes in pimpri chinchwad pune)