सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यास मनाई ; पुण्याच्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातही जमावबंदी

| Updated on: Nov 14, 2021 | 5:17 PM

खबरदारीचा उपाय म्हणून पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही फौजदारी दंड प्रक्रिया संहितेच्या कलम 144 नुसार प्रतिबंधक आदेश लागू करण्यात आले आहेत. ग्रामीण भागात 14 नोव्हेंबरपासून ते 20 नोव्हेंबरपर्यंत 24  तासांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ, राजेश देशमुख यांनी पत्रक काढून ही माहिती दिली आहे.

सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यास मनाई ; पुण्याच्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातही जमावबंदी
Pune District Collector office
Follow us on

पुणे – त्रिपुरा येथे मशीद जाळल्याच्या अफवेनंतर देशासह महाराष्ट्रात त्याचे प्रडसाद उमटले. अमरावती, नांदेड, मालेगाव येथे जातीय दंगली उसळल्याची घटना नुकतीच घडलीया आहे. अमरावतीत सलग सुरु राहिलेल्या हिंसाचारामुळे तेथे चार दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या पाठोपाठच खबरदारीचा उपाय म्हणून पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही फौजदारी दंड प्रक्रिया संहितेच्या कलम 144 नुसार प्रतिबंधक आदेश लागू करण्यात आले आहेत. ग्रामीण भागात 14 नोव्हेंबरपासून ते 20 नोव्हेंबरपर्यंत 24  तासांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ, राजेश देशमुख यांनी पत्रक काढून ही माहिती दिली आहे. या जमावबंदीच्या काळात नागरिकांना खालील नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.

या नियमाचे पालन करणे बंधनकारक

  • कोणत्याही व्यक्तीला फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम या सोशल माध्यमावर समाजात जातीय तणाव निर्माण होईल अश्या गोष्टी टाकता येणार नाही तसेच फॉरवर्ड करता येणार नाहीत.
  • कोणत्याही व्यक्तीने फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, व्हॉटसअ‍ॅप इत्यादी सोशल माध्यमाद्वारे समाजात जातीय तणाव निर्माण होणारा मजकूर लिहिल्यास तसेच फॉरवर्ड केल्यास त्याची सर्व जबाबदारी ग्रुप ऍडमिनवर राहिल.
  • समाजात चुकीची माहिती/ जाणीवपूर्वक अफवा पसरवणे.
  • पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येणे तसेच शस्त्र, लाठी, काठी बाळगण्यास , सभा घेण्यास मनाई असेल.
  • कोणत्याही प्रकारचे जातीय तणाव निर्माण करणाऱ्या मजकुराचे पोस्टर लावणे ,व त्या प्रकारच्या घोषणा देणे गुन्हा समाजाला जाईल.

 

या वरील नियमांचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड विधान कायद्याचे कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याची महिती जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिली आहे.

अमरावतीत इंटरनेटही बंद
अमरावतीत काल मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हिंसाचाराबाबतच्या कोणत्याही अफवा पसरून पुन्हा हिंसाचार उसळू नये म्हणून इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. सोशल मीडियावरून कोणताही अपप्रचार होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे.तर दुसरीकडे अकोला जिल्ह्यातील अकोटमध्येही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अकोटमध्ये 24 तासांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दगडफेकीच्या घटनेनंतर ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

हेही वाचा

अन्यायाविरोधात लढणारा आदिवासी नक्षली नाही, शिवरायांचे राज्य भोसल्यांचे नव्हे तर ते रयतेचे हिंदवी स्वराज्य, शरद पवारांचे प्रतिपादन

VIDEO: एसटी कामगारांच्या आत्महत्यांना रक्तपिपासून आघाडी सरकारच जबाबदार; आशिष शेलार यांचा हल्लाबोल

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही काय पवार साहेबांची प्रॉपर्टी नाही, चंद्रकांत पाटील यांचे खोचक वक्तव्य