पुणे – ग्रामीण भागाच्या दृष्टीने बँका ह्या आर्थिक नाडी म्हणून ओळखल्या जातात. मला आठवतय 1991 साली त्यावेळी स्वर्गीय सुभाष अण्णा कुल व रमेश थोरात यांनी एका कार्यक्रमात सांगितले होते की, तुम्हाला जिल्हा बँकेच्या राजकारणात यायच असेल तर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी अ वर्गातून निवडणूक लढवा. त्यावेळी बारामतीतील जागा कधी आपल्या विचारांची येत नव्हती , तिथे आपले सहकारी काकडे परिवाराचं वर्चस्व होतं, त्यामुळं तिथं निवडणूक लढवायला नाखूष असायचे. पण या दोघांचे म्हणणे मी ऐकले त्यावेळी धाडस दाखवले. लोकांना वैयक्तिक भेटलो. लोकांनी मला निवडणूक दिले अन मी बँकेत गेलो . तेव्हा बँकेच्या ठेवी होत्या 391 कोटी रुपये. आज या गोष्टीला 30 वर्ष झाली. बँकेच्या ठेवी आता 11 हजार कोटीच्या पुढे गेलेल्या आहेत. असे म्हणत राजकारणातील 30 वर्षापुर्वीच्या प्रवेशाचा त्यांना उलगडा केला.
इतकच नव्हे तर महाराष्ट्रातील इतर जिल्हा बँका कश्याप्रकारे रसातळाला गेल्या याची माहिती सांगत कानपिचक्याही काढल्या. जिल्हा बँकांनी जिल्हा परिषदेचे पैसेही बुडवले. शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाहीत. शेतीच्या सुधारणेसाठी आवश्यक असलेल्या सुधारणा होत नाहीत. कारण तिथली परिस्थिती बिकट झाली आहे. कर्मचाऱ्यांचे पगार व्यवस्थित होत नाहीत. अशी टीकाही त्यांनी केली आहे. नागरिकांनी ग्रामस्थांनी विश्वासानं ठेवलेला पैस, तिथे व्यवस्थित राहायला पाहिजे. यासाठी आम्ही काही नियम केले आहेत. असे मत अजित पवार यांनी बोलताना व्यक्त केले.
लोकांना गांभीर्य नाही…
कोरोनाच्या गर्दीवरून अजित पवारांनी नागरिकांना सुनावलं. बाबांनो, माझी विनंती आहे, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून लाट येणार आहे. खूप काळजी घेण्याची गरज आहे. अधिवेशनात मला म्हणाले, की मी सभागृहात आल्यापासून ते जाईपर्यंत मास्क लावलेला असतो. बोलताना काढत नाही. आपल्याला नियम पाळावेच लागणार आहे. आपणच नियम पाळत नसू तर लोकांना सांगायचा अधिकार नाही. जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे.
नवीन वर्षाच स्वागत घरातच करा
नवीन वर्षाच स्वागत बाहेर न करता घरातच करा. आम्हालाही बंधन घालायला बर वाटत नाही. आत्ता कुठं परिस्थिती सुधारत होती, पण परत नव्याने उद्भवल. काही राज्यांनी रात्रीच लॉकडाऊन लावलं आहे. काहींनी तर निवडणूक पुढे ढकल्यात आहेत. बरेच जण भेटतात, पत्र पाठवतता तुमच्यासाठी हॉटेलच उदघाटन, कार्यालयाच उदघाटन थांबलं आहे. पण मी आलो तर गर्दी होणार आहे.
Mumbai Drugs Case | उच्चभ्रू कुटुंबातील महिलाही ड्रग्ज व्यवसायात, झटपट पैशाच्या मोहाने सहभाग वाढता
Mahajyoti | जे कृषी विद्यापीठाला जमलं नाही ते महाज्योतीनं केलं; काय आहे हा 15 हजार एकरवरील प्रकल्प?